BULDHANAHead linesVidharbha

‘चोर बने है ठाणेदार..!’

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही, मात्र भ्रष्टाचार आज यंत्रणेचा भाग झाल्याची ओरड आहे. राजकीय दबाव व भ्रष्टाचाराला सरकारी यंत्रणेमधून खोदून काढणे अत्यंत कठीण झाल्याचा प्रश्न आहे. परंतु राजकीय दबाव, पोलिसांची हतबलता याचा प्रत्यय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधून येत आहे. ‘ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार.. चोर बने है ठाणेदार..’ या गीतावर रविकांत तुपकर यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

गाणे एकण्यासाठी येथे क्लीक करा..

शेतकरीहितासाठी आत्मदहन आंदोलन पेटल्यानंतर, न्यायालयीन कोठडीत अकोला कारागृहात असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि २४ आंदोलकांच्या जमानत अर्जावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. आज त्यांच्या सुटकेचा सर्वत्र जल्लोष होत आहे. त्यांनी ११ फेब्रुवारी रोजी बुलढाण्यात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला होता. त्यानंतर रविकांत तुपकरांसह २४ जणांना अटक करुन त्यांच्यावर भादंवि ३५३, ३०९, १७१, १४७, १४८, १४९, ३३६, १०९, १८८ सह कलम ३ प्रॉर्पट्री डॅमेज ?क्ट, सहकलम १३५ मुपोका.नुसार गुन्हे दाखल केले होते. मध्यरात्री उशिरापर्यंत या सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना चिखली येथे ठेवण्यात आले. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात या सर्वांना बुलढाणा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुलढाणा कारागृहात जागा नसल्याचे सांगत या सर्वांची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली. दरम्यान, सदर आंदोलकांच्यावतीने अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी १३ फेब्रुवारी रोजी जमानत अर्ज दाखल केला होता. त्यावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. अतिरक्त सत्र न्यायाधीश पी. ए. साने यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. आंदोलक आरोपींच्यावतीने अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी युक्तिवाद केला. यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. दरम्यान, आज त्यांची सुटका झाली आहे. याचा सर्वत्र जल्लोष होत असून, फेसबुक व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘बंद करो हे भ्रष्टाचार… चोर बने है ठाणेदार..’ गीतावरील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!