BULDHANAVidharbha

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने रुग्णांना फळवाटप

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सिंदखेडराजा तालुकाच्यावतीने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे यांच्याहस्ते साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. निमित्त होते दैनिक सकाळचे जेष्ठ बातमीदार डी. एन. पंचाळ सर यांच्या वाढदिवसाचे.

डी .एन . पंचाळ सर हे दैनिक सकाळमध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पत्रकारिता करत आहेत. शिवाय, माजी प्राचार्यसुद्धा राहिलेले आहेत. त्यानिमित्ताने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्यावतीने दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे व तसेच सर्व पत्रकार बांधवांच्यावतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, दैनिक लोकमतचे पत्रकार अशोक इंगळे, दैनिक देशोन्नतीचे सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी मनोज पर्‍हाड सर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमार सुरशे, ‘डॉक्टर शेख शफाअत, दैनिक भारत संग्रामचे जिल्हा प्रतिनिधी, जिल्हा एक्सप्रेस दैनिक महासागरचे प्रतिनिधी सचिन खंडारे, दैनिक भारत संग्रामचे चिखली तालुका प्रतिनिधी सुनील अंभोरे, शौर्य स्वाभिमानचे विभागीय प्रतिनिधी कैलास आंधळे, दैनिक भारत संग्रामचे सिंदखेडराजा प्रतिनिधी डॉक्टर गंगाराम उबाळे, ‘दैनिक सकाळचे मलकापूर पांगरा प्रतिनिधी अमोल साळवे, ‘रावसाहेब वायाळ, ‘पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन इंगळे, ‘गोपाल मामा मानतकर, ‘ डॉ . चव्हाण, कर्मचारी गजानन खिल्लारे आदी सर्व डॉक्टर, पत्रकार बांधव यावेळी आवर्जुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!