चिखली (शहर प्रतिनिधी) – तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात काल त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांना १२५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रतिष्ठित गावकरी उपस्थित होते. तसेच, तथागत बहुउद्देशीय संस्था साकेगाव यांनी संध्याकाळी साडेसात वाजता माता रमाई यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त केक कापून सर्व समाज बांधवांनी जयंती साजरी केली.
यावेळी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अनिता निकाळजे व सुनिता निकाळजे यांनी पुष्पहार अर्पण केला. ग्रामपंचायतचे उपसरपंच देविदास लोखंडे व शिपाई अफसर भाई यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून नंतर त्यागमूर्ती माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. कुशीवर्त निकाळजे, लक्ष्मीबाई निकाळजे, रमाबाई वानखेडे त्यानंतर पल्लवी निकाळजे हिने त्यागमूर्ती माता रमाई यांच्या वेशभूषेत केक कापून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रकाश निकाळजे यांनी त्यागमूर्ती माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. एकनाथ कौतिकराव मोरे या विद्यार्थ्यांने गीत गायन केले. किंजल दिनकर निकाळजे यांनीही माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितू निकाळजे यांनी केले. विष्णू निकाळजे, वसंत निकाळजे, पंजाब निकाळजे, अंतकला निकाळजे, चंद्रकला निकाळजे, लताबाई निकाळजे, छायाबाई निकाळजे, कौशल्याबाई निकाळजे, जिजाबाई निकाळजे, लिलाबाई निकाळजे व असंख्य समाज बांधव, बुद्ध उपासक, उपासिका यांना खाऊ व केकचे वाटप करण्यात आले. त्यानंतर तथागत बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जितू निकाळजे यांनी कार्यक्रमची सांगता केली.