Aalandi

खेड डाक उपविभागातर्फे आळंदीत आर्थिक साक्षरता मोहीम

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पुणे ग्रामीण डाक विभाग व खेड डाक उपविभाग यांच्या मार्फत आळंदी शहर व परिसरात सलग चार दिवसा पासून नागरिकांना व त्यांच्या मुलांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने आर्थिक साक्षरता मोहीम उत्साहात राबवण्यास सुरवात करण्यात आली. यात २६ ते २९ जानेवारी पर्यंत घरोघरी जाऊन सुकन्या समृद्धी खाते तसेच भविष्य निर्वाह निधी खाते यांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. २००२ खाती उघडण्यास नागरिकांनी अर्ज करून उत्साही प्रतिसाद दिला आहे.

या काळात स्वतः डाक अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग बाळकृष्ण एरंडे, सहाय्यक अधीक्षक निवासी सुखदेव मोरे, निरीक्षक डाकघर खेड उपविभाग प्रमोद भोगाडे या सोबतच डाक विभागातील जवळपास ५० पेक्षा जास्त कर्मचारी सुट्टी असूनही स्वयंसेवक म्हणून आर्थिक साक्षरता मोहिमेसाठी उपस्थित होते. आता पर्यंत ७५० पेक्षा जास्त सार्वजनिक भविष्य निधी खाती उघडली गेली असून २००० खाती उघडण्यासाठी नागरिकांनी अर्ज केले आहेत.
भारत सरकार तर्फे बचत करण्यासाठी, सर्वात जास्त व्याजदर, आज कालच्या युगात online पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याने सुकन्या समृद्धी योजना व सार्वजनिक भविष्य निधी योजना या वरदान ठरत आहेत. खेड उपविभाग तर्फे नागरिकांना माहिती व इतर पोस्ट ऑफिस संदर्भात मदतीसाठी ७०२८००७२६० या क्रमांकावर whats app संपर्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हि विशेष मोहीम १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सतत खेड, आंबेगाव, शिरूर व जुन्नर ताल्युक्यांत पोस्ट ऑफिस द्वारे राबविण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक डाकघर खेड व जुन्नर उपविभाग प्रमोद भोगाडे यांनी दिली. तसेच भारतीय डाक विभागा तर्फे आपल्या प्रत्येक मुलगा किंवा मुलगी च्या जीवनामध्ये आर्थिक रोपटे लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या मोहिमेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कार्यरत कर्मचारी तसेच दर्शनासाठी आलेले पोलीस अधिकारी यांच्याकडून ‘सार्वजनिक भविष्य निधी ‘ आवेदन पत्र अधीक्षक डाकघर बाळकृश्न एरंडे, सुजाता ठाकूर,उषा हवाले, पूनम पाटील आदी पोष्ट ऑफिस कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी इम्रान हकीम

आळंदी : आय.पी.सी. (इंडियन प्रेस कौन्सिल रन बाय इंटलेक्चुअल) भोपाळ येथील सोशल मीडिया संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी इम्रान हकीम, उपाध्यक्षपदी भारत थोरात, सचिव वैभव रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी आयपीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश सक्सेना आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत भोपाळ येथील कार्यालयात जाहीर करण्यात आल्या. या नियुक्तीचे आळंदी पंचक्रोशीत स्वागत करण्यात आले.आळंदी जनहित फाउंडेशनचे विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी निवडी नंतर निवडीचे स्वागत करून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिमानदं केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!