Pachhim MaharashtraSOLAPUR

दोड्डी येथे शेकडो गावकऱ्यांनी ऐकली मोदींची ‘मन की बात’!

साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात दोड्डी (तालुका दक्षिण सोलापूर) येथे गावातील व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी व भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐकले. 

अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दोड्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात टीव्हीवर पाहण्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना चे तालुका प्रमुख संदीप राठोड यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.  यावेळी आयोजक सदाशिव चौगुले, तारासिंग राठोड, शिवाजी राठोड, उपसरपंच लक्ष्मण गावडे, लक्ष्मण गिराम, संजू जेडगे, संदीप येरवडे, नागेश चौगुले, धनराज होनपारखे, विठ्ठल काळे, मोहन खांडेकर, संतोष कोरे, बाळू येरवडे, सागर खांडेकर, सुरेश पवार, शिवाजी पवार, प्रभाकर निकम, तम्मा म्हेत्रे, शशिकांत चौगुले, इरांण्णा चौगुले, उमा सावळे, चन्नाप्पा चौगुले, मल्लिनाथ बिजगे, नवनाथ चौगुले, लक्ष्मण अशोक गिराम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!