BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

शेगावातील एक कोटींच्या दरोड्याचा मास्टरमाइंड सोनाटीबोरीचा वैभव मानवतकर?

– शेगावातील पालडीवालांच्या घरी पडला होता तब्बल एक कोटींचा दरोडा

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेगाव येथील श्रीमंत व्यापारी आनंद पालडीवाल यांच्या घरावर सिनेमास्टाईल दरोडा टाकून तब्बल एक कोटींची घरफोडी करणार्‍या मेहकर तालुक्यातील सोनाटीबोरी येथील वैभव मानवतकर व त्याच्या दोन साथीदारांच्या शेगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. शेगाव येथील मटकरी गल्लीतील आनंद पालडीवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कडी-कोंडा तोंडून १५ जानेवारीच्या मध्यरात्री या दरोडेखोरांनी हा दरोडा घातला होता. मानवतकर याला १९ जानेवारीरोजीच उचलले होते, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलला. त्याच्या माहितीतून आणखी दोन आरोपी पिंपरी देशमुख तालुका व जिल्हा परभणी येथून जेरबंद करण्यात आले.

पालडीवाल यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये दोनच आरोपी दिसून आले असले तरीही, या घरफोडीत अधिक आरोपी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आधी एक व त्यानंतर दोन असे एकूण तीन आरोपी आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केले असून, या घरफोडीत आणखी आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शेगाव शहरात पहिल्यांदाच इतका मोठा दरोडा पडला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याने या दरोड्यातील आरोपी अवघ्या पाच दिवसांत जेरबंद करण्यात आलेत. आतापर्यंत एकूण ‘तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यात मेहकर तालुक्यातील सोनाटीबोरी येथून वैभव मानवतकर याला जेरबंद करण्यात आले. त्याच्या माहितीतून २० जानेवारीरोजी मुंजा तुकाराम कहाते (२०), प्रीतम अमृतराव देशमुख (२९) या दोघांना परभणी जिल्ह्यातून जेरबंद करण्यात आले आहे.

पालडीवाल कुटुंब आईच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी बाहेर गेल्याची संधी साधत, १४०० ग्रॅम सोन्याचे दागिने, २ किलो चांदी व २५ लाख नगदी असा ऐकून एक कोटींच्या आसपास ऐवज या दरोडेखोरांनी लंपास केला होता. एक कोटीची घरफोडी झालेली शेगावची घटना जिल्ह्यातील सर्वात मोठी घटना होती. सीसीटीव्हीमध्ये आरोपीचे फुटेज आल्याने व तांत्रिक महितीच्या आधारे पोलिसांनी कसून तपास केल्याने आरोपींना अटक करण्यात यश आले.
—————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!