ChikhaliHead linesVidharbha

मेरा चौकीवर भरधाव कारच्या तीन पलट्या, भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली!

चिखली (एकनाथ माळेकर) – मेरा चौकी येथील असोला फाट्यादरम्यान भरधाव कारने अचानक ब्रेक मारल्याने कार पलटी होऊन या कारने तीन पलट्या मारून ती शेजारील शेतात आदळली. या भीषण अपघातात नशीब बलवत्तर म्हणून प्राणहानी झाली नसून, गाडीचे मात्र नुकसान झाले आहे. आज (दि.२२) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे बुलढाणा येथील कर्मचारी प्रदीप वानखेडे व त्यांच्या पत्नी या जखमी झाल्या असून, या दाम्पत्याला चिखली येथील जंजाळ हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले आहे. ते मूळचे वाडी येथील असल्याने वाडी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे आज (दि.२२) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान बुलढाणा येथील वानखेडे कुटुंब धोत्रा नंदाई येथून एंगेजमेंटचा कार्यक्रम आटोपून धोत्रा नंदीई येथून बुलढाणाकडे जात असताना मेरा चौकी येथे असोला फाटा यादरम्यान ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्यामुळे मारुतीकारणे तीन पलट्या घेतल्या. परंतु अपघातामध्ये कोणतेही दुर्देवी घटना घडली नाही. सदर गाडीमध्ये बुलढाणा येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कर्मचारी प्रदीप वानखेडे, त्यांच्या पत्नी छाया प्रदीप वानखेडे यांना हाताला मार लागला असल्यामुळे त्यांना चिखली येथील जंजाळ हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. प्रदीप वानखेडे हे मूळचे वाडी येथील असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस भगवानराव काळे यांनी दूरध्वनीवरून सदर प्रकरणाबद्दल वाडी येथील वानखेडे कुटुंबांना माहिती दिली. त्यामुळे गावातील बहुसंख्य नागरिकांनी जंजाळ हॉस्पिटल येथे एकच गर्दी केली होती.

या अपघातग्रस्त गाडीमध्ये दोन महिला व प्रदीप वानखेडे व त्यांचा मुलगा व एक ड्रायव्हर असे प्रवासी होते. परंतु बाकीच्यांना किरकोळ मार लागला व छाया प्रदीप वानखेडे यांना हाताला मार लागल्यामुळे त्यांना चिखली येथील जंजाळ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या कारवरील चालक हा मद्यपान करत असल्याचा अंदाज असोला व मेरा खुर्द येथील तरुण मित्र मंडळाने ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केलेला आहे. तसेच सदर मारुती कारचा ड्रायव्हर हा कार पलटी झाल्यानंतर तिथून निघून जाऊन थोड्यावेळाने त्या ठिकाणी आला अशी माहिती घटनास्थळी असलेल्या मित्रमंडळींनी दिली आहे. सदर अपघात हा साडेपाच वाजेच्या सुमारास मेरा खुर्द ते असोला उर्दू शाळेजवळ झाला. या ठिकाणी या आधीसुद्धा अपघात होऊन नऊ जणांचे प्राण गेलेले आहेत. सदर रोड हा अपघातप्रवण असल्याचे सांगण्यात आले असून, या रोडचे काम या ठिकाणी निकृष्टदर्जाचे दिसून येत आहे. या ठिकाणी कोणताही बोर्ड नसल्यामुळे ड्रायव्हरला समोरील अंदाज येत नाही.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!