चिखली (तालुका प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या माध्यमातून देशभरात आयोजित एक्झाम वॉरिअर्स चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्वाधिक संख्येने सहभागी होण्याचा विक्रम चिखली विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी नोंदवला आहे. २४ शाळांमधील ६८०० विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर परीक्षा संपूर्ण देशामध्ये घेण्यात आली होती. महाराष्ट्रसुद्धा परीक्षा घेण्यात आली. परंतु महाराष्ट्रातून सर्वात जास्त चिखली विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती.
या एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेसाठी २२ हजार ६३१ एव्हढी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी झालेली होती. त्यात एकट्या बुलडाणा जिल्ह्यातून ५६६३ तर त्यातील चिखली विधानसभा मतदार संघातून तब्बल ४११० विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तसेच २००० पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनीना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी आल्याने त्यांनी नोंदणी न करता परीक्षा दिली आहे. या स्पर्धेत सहभागी शाळांमधून शाळानिहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. स्मृती चिन्हसुद्धा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी परीक्षार्थीना सहभाग प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अॅड. सुनील देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे, देविदास जाधव पाटील, संजय महाले, सागर पुरोहित, सुहास जामदार, विनोद सीताफळे, बंडू अंभोरे, प्रशांत पाखरे, शंकर तरमळे, डॉ राजेश्वर उबरहंडे, डॉ. तेजराव नरवाडे, विष्णू वाघ, संदिप उगले आदींनी परिश्रम घेतले होते.
आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक – आ. सौ. श्वेताताई महाले
परीक्षा मग ती कोणतीही असो, अभ्यास केल्याशिवाय पास होता येत नाही. नाही म्हणायला कॉपी करून पास होणार्यांची संख्या काही कमी नाही. परंतु कॉपी करणारा प्रत्येक लढाईत यशस्वी होण्याची गॅरंटी नसते. परंतु जो मेहनतीच्या तिच्या जोरावर अभ्यास करून परीक्षा देत असतो तो प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होत असतो. परीक्षा म्हटली की ताणतणावालाच, टेन्शन आलंच. तणावात कोणतेही काम चांगले होत नाही हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. त्यामुळेच परीक्षा देताना तणावमुक्त होऊन जर परीक्षा दिल्या गेली तर ती अधिक चांगल्या पद्धतीने दिल्या जाते आणि त्यामुळेच तणावमुक्त होऊन दिलेल्या परीक्षेचा रिझल्ट सुद्धा चांगला लागतो, हीच वैज्ञानिक बाब हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी. यासाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची संकल्पना मांडली. या संकल्पनेचाच एक भाग म्हणजे एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा होय. ही चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थीनी तणाव मुक्त होऊन व्हावं आणि येणार्या त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार्या १० वी १२ वी आणि इतर वर्गाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परीक्षेमध्ये चांगली कामगिरी करावी हा त्या मागचा उद्देश आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त होऊन येणार्या परीक्षांनाच नव्हे तर आयुष्यातील सर्वच परीक्षा देताना तणावमुक्त होऊन आणि मेहनत घेऊन दिलेली प्रत्येक परीक्षा तुम्हाला आयुष्यात यशस्वी करेल, असे प्रतिपादन आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना करून विद्यार्थी, विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्यात.
—————-