Head linesPachhim Maharashtra

भाजप नेते मोहन वनखंडे यांच्या संपत्तीची ईडी कडून चौकशी करावी : डॉ. महेशकुमार कांबळे यांची मागणी

सांगली (जिल्हा प्रतिनिधी) – मिरजमधील सांगलीकर मळा येथील गट नं १२८/२ ही जागा १३७ गुंठे जमीन अनाथ विद्यार्थी सहाय्यक मंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते तथा माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह ४ जणांची होती. तर अनाथ विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांची कोणतीही एनओसी न घेता सदरची जागा भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव तसेच विद्यमान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे खाजगी सचिव मोहन वनखंडे यांनी चैतन्य माऊली डेव्हलपर्सचे भागीदार म्हणून आणि दुसरे भागीदार बबन शंकर लवटे यांनी २०२१ रोजी खरेदी केली आहे. तर यासाठी सांगली अर्बन को. ऑप बँक लि. सांगली यांनी २०२१ ला यासाठी ३ कोटींचे कर्ज दिले होते. सदरची जागा खरेदी करताना २०२१ रोजी कोरोना लॉक डाऊन असताना मिरज दुय्यम निबंधक क्र १ हे रजेवर असताना एका कनिष्ठ लिपिक असणार्‍या मारुती अर्जुन सुभाणे यांच्या सहीने खरेदी करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केला आहे.

सदरची जागा अनाथ विद्यार्थी सहाय्यक मंडळाची असताना खरेदी झालीच कशी, असा सवाल उपस्थित केला आहे. तर खरेदी दस्त करणार्‍या लिपिक व प्रभारी मारुती अर्जुन सुभाणे यांची चौकशी करून त्यांनासुद्धा निलंबित करण्याची मागणी यावेळी डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली. मोहन वनखंडे यांची ईडी आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी सुद्धा पंतप्रधान रोजगार निधी योजनेतून पत्नी साठी आणि मुख्यमंत्री रोजगार निधी योजनेतून स्वतः साठी एकच व्यवसाय आणि एकाच जागेची कागदपत्रे दाखवुन सत्तेचा दुरुपयोग करून २५ लाख रुपये पंतप्रधान रोजगार निधी योजना आणि २५ लाख रुपये मुख्यमंत्री रोजगार निधी योजना कडून मंजूर करून घेऊन दोघा पती पत्नीनी सत्तेचा दुरुपयोग करून अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!