Head linesMaharashtraVidharbhaWARDHA

कारंजात भरदिवसा घरफोडले, ४० लाखांचा ऐवज लंपास

– चोरटे पकडण्याचे वर्धा पोलिसांसमोर आव्हान

वर्धा (प्रकाश कथले) – नागपूर ते अमरावती महामार्गावरील कारंजा शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडीत तब्बल ४० लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. चोरट्यांनी ७० तोळे सोन्यासह दीड किलो चांदीवर डल्ला मारला. धान्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांच्या घरी कोणी नसताना चोरटे घरात शिरले. त्यांनी दागिन्यांचा अचूक शोध घेत ही चोरी केली. सायंकाळच्या सुमारास ही घरफोडी उघडकीस आली. चोरीस गेलेल्या दागिन्यांत ४० तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट, ३० तोळे वजनाचे मंगळसूत्र, बांगड्या, इतर ऐवज तसेच दीड किलो चांदीसह २ लाख रुपयांच्या रोख रकमेचाही समावेश असल्याची माहिती अशोक अग्रवाल यांनी दिली. सुमारे १५ वर्षांनंतर याच घरात ही चोरीची दुसरी घटना घडली आहे.

अग्रवाल कुटुंबीय नागपूर येथे गेले असता दिवसभर धान्य दुकानात अशोक अग्रवाल उपस्थित होते. सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान दुकानातून घरी जात असताना दुचाकीवर दोन जण जवळ येऊन विचारणा करण्यात आली. त्यावेळेस काहीकाळ त्यांनी अग्रवाल यांना थांबविले. त्यानंतर अग्रवाल हे घरी गेले असता घराचा दरवाजा कुलूप बंद होता. कुलूप उघडून घरात शिरले असते त्यांना चोरी झाल्याचा भास झाला. त्यांनी तत्काळ पत्नीला माहिती देऊन नागपूर येथून बोलाऊन घेतले. यावेळेस पत्नीने ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत कारंजा पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्यात आली नसून पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तक्रार दाखल केल्यानंतर चोरी मध्ये काय काय चोरीला गेले हे स्पष्ट होईल. घरात लाखो रुपयाच्या जवळपास रोख रक्कम होती.तर सुनेच्या गळ्यातील गोफासह काही दागिने उघड्यावर ठेवले होते. त्याच्या खाली जवळपास दीड लाख रूपयांची रोख रक्कमही होती. मात्र चोरट्याने जी माहिती होते तिथेच हात साफ करून निघून गेल्याने लाखो रुपये चोरीपासून बचावले असल्याचे सांगण्यात आले.
अज्ञात चोरट्याने शिताफीने ही चोरी केली.घराला लावलेल्या कुलुपाची चाबी अगोदरच चोरट्यांकडे असल्याने स्वतः चोरटा घरात कोणी नसताना कुलूप चाबीने उघडून घरात शिरला. चोरट्याने अचूकपणे काचेच्या शोकेसमध्ये असलेले ४० तोळ्याचे बिस्कीट चोरून नेले तर बेडरूममध्ये लाकडी कपाटाच्या खाली ठेवलेले ३० तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीची चोरी करण्यात आली. त्याशिवाय दीड लाख रुपयांची रोख रक्कमही लंपास केली.


आज कुटुंब बाहेर गावी जात आहे. अख्खे कुटुंब खासगी दवाखान्यात तपासणीला जात असून घरी कोणीच राहणार नाही.त्यावेळीच चोरी करण्याची माहिती चोरट्याला कशी मिळाली, सोन्याची बिस्किटे कोठे ठेवले याची माहिती त्याला होती. अग्रवाल यांना सोने कोठे ठेवले याची माहिती नव्हती, मग ती चोरट्याला कशी कळली, हा प्रश्न पोलिसासह अग्रवाल कुटुंबीयाना पडला आहे. १५ वर्षांपूर्वी याच घरात चोरी झाली होती. खिडकी तोडून १५ वर्षांपूर्वी कुटुंबीय घरात असताना चोरट्यानी कुटुंबाला आतमध्ये बंद करून धान्याची रक्कम चोरलीr होती. जवळपास त्यावेळी सहा ते सात जण घरात शिरून चोरी करण्यात आली होती. पोलिस तपास करीत आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!