Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

प्रशासन आणि पत्रकारांची मैत्री विकासाला पूरकच – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पत्रकार हे फ्रेंडस, फीलॉसॉफर आहेत. ते समाजाचा आरसा बनून वास्तव मांडत असतात. प्रशासनाची आणि पत्रकाराची मैत्री ही असलीच पाहिजे. त्यातून विकासाची प्रक्रिया गतिमान होते, असे मत जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावर दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवेढेकर इन्स्टिट्युटच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस आयुक्त राजेंद्र माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.मृणालिनी फडणवीस होत्या. मुद्रित माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर मयुरेश कोन्नूर तर डिजिटल माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर विश्वनाथ गरूड यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, मयुरेश कोन्नूर, विश्वनाथ गरुड, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले, डॉ. बाळासाहेब मागाडे, डॉ. अंबादास भासके, ऋषीकेश मंडलिक यांनी केले. प्रास्ताविकात सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यावतीने घेण्यात येत असलेली ही कार्यशाळा महत्त्वाची आहे. मास कम्युनिकेशन विभाग हा कौशल्य युक्त पत्रकार घडविण्यात अग्रेसर आहे. या कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी ( मुंबई) हे मुद्रित माध्यमातील नव्या प्रवाहाबाबत मार्गदर्शन करताना म्हणाले की, पत्रकार हा समाजाच्या समस्या मांडतो. परंतु पत्रकारांच्या समस्या मांडण्याचे काम आम्ही करत आहोत. मुद्रित माध्यमे झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे या बदलासोबत पत्रकारांनीही बदलण्याची गरज आहे. नागपूर नंतर निवृत्ती नंतर जर कुठे राहायला आवडेल तर ते सोलापूर आहे. येथे तीन भाषांचे संगम असणार म्हणजे सोलापूर शहर आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील नवे प्रवाह या विषयावर मयुरेश कोन्नूर यांनी मांडणी केली. तर म्हणाले की, डिजिटल मीडिया, सोशल मीडियामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमात नवे बदल होताना दिसत आहेत. आता घडलेली बातमी सोशल मीडियावर लगेच वाचकांना पाहायला मिळते. मुद्रित माध्यमा प्रमाणेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावर लोकांचा मोठा विश्वास आहे. या माध्यमाची एक ठराविक पद्धतीची भाषा असते. चित्रफीत, आवाज, शब्द याचे वेगळ्यापद्धतीने सादरीकरण करून ही वेगळी भाषा विकसित होत राहते.

विश्वनाथ गरूड म्हणाले की, निश अर्थात एखाद्या विषयावर सातत्याने सखोल लेखन करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची संख्या आणि वेगळेपणा असावा. गुगल ?डसेन्स कंपनी आपली धोरणे सतत बदलत आहे. त्याचाही अभ्यास करायला हवा. डिजिटल पत्रकारितेसमोर अनेक संकटे आहेत. नवे बदल स्वीकारायला हवेत. तंत्र साक्षर बनावे. टेक्नोलॉजी कंपन्यामध्ये कंटेंट क्रिएटरच्या नोकरीच्या खूप संधी आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यं. कुलकर्णी, अभय दिवाणजी, नारायण कारंजकर, प्रशांत माने, श्रीकांत कांबळे, दशरथ वडतिले, समाधान वाघमोडे आदी उपस्थित होते.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!