Head linesKARAJATPachhim MaharashtraWomen's World

कुस्ती स्पर्धेमध्ये चित्तथरारक लढती!

– रौप्य व कांस्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंना पदके देवून गौरव

कर्जत (प्रतिनिधी) -रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन दि. ६ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी ६५ किलो व ७२ किलो वजनी गटातील कुस्त्या संपन्न झाल्या. चार मॅटवर होत असलेल्या लढती अत्यंत रोमहर्षक होत असून, काही लढती पूर्णवेळ एकमेकाला लढवत अत्यंत चुरशीच्या होत आहेत, तर काही लढतीत क्षणाचा विलंब न लावता डाव टाकत विजय संपादन केला जात आहे. दिवसभर दोन सत्रात खेळवल्या जात असलेल्या या स्पर्धेत आज दोन गटाच्या लढती पार पडल्या. ६५ व ७२ किलो वजनी गटातील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले.

६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती- शेफाली, महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक, रौप्य पदक विजेती- मुस्कान देवी, गुरू नानक देव विद्यापीठ अमृतसर, व कांस्यपदक विजेत्या मोनिका, महाराजा गंगा सिंग विद्यापीठ बिकानेर व वर्षा, चौधरी देविलाल विद्यापीठ सिरसा यांना पदके मिळाली. ७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती जगबीर सिंह, ओपीजेएस चारू विद्यापीठ राजस्थान, रौप्यपदक विजेती हनी, राजा महेंद्रप्रतापसिंग विद्यापीठ अलिगढ, व कांस्य पदक विजेत्या मंजू, गुरूनानक देव विद्यापीठ अमृतसर व निकिता, भगत फूल सिंग महिला विद्यापीठ, खानपूर कलान यांनी पदके मिळवली. पदक विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याला बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, प्रा. मधुकर राळेभात, बाळासाहेब साळुंके, नामदेव राऊत, सुभाष गुळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे, स्पर्धा निरीक्षक डॉ. राजेंद्र खत्री, स्पर्धेचे टेक्निशिअन गुंड सर, दत्ता महादम, आदिसह अनेक मान्यवर तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक, कर्जतमधील सामाजिक संघटना, पत्रकार संघ, रोटरी क्लब, कर्जत-जामखेड क्रीडा संघटना आदि संघटनांचे अनेक पदाधिकारी व कर्जत ग्रामस्थ, कुस्तीप्रेमी आदिंच्या उपस्थितीत पदकविजेत्या स्पर्धकांचा सत्कार वितरणाचा शानदार समारंभ संपन्न झाला. प्राचार्य डॉ.संजय नगरकर, स्पर्धा संयोजक डॉ.संतोष भुजबळ, प्रा. शिवाजी धांडें, उपस्थित कुस्तीप्रेमींनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेकरिता भारतभरातून आलेल्या १३० विद्यापीठातील स्पर्धकांच्या मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सादर केला गेला.

शनिवार दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी ५३ किलो, ५७ किलो, ६२ किलो वजनी गटात रोमहर्षक कुस्त्या संपन्न झाल्या होत्या यामध्ये ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती- मिनाक्षी, महर्षी दयानंद विद्यापीठ रोहतक, रौप्य पदक विजेती- प्रियांशी, रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ मध्य प्रदेश, व कांस्यपदक विजेती स्विटी, गुरूनानक विद्यापीठ अमृतसर व स्वाती, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना पदके मिळाली. ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती रजनी, गुरूनानक देव विद्यापीठ, रौप्यपदक विजेती कर्जतची भूमिकन्या सोनाली मंडलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व कांस्य पदक विजेत्या कल्पना, छ.बन्सीलाल विद्यापीठ भिवानी व निकिता, महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक यांनी पदके मिळवली. ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक विजेती निकिता, दिल्ली विद्यापीठ, रौप्य पदक विजेती प्रिâडम यादव व कांस्य पदक मिळविणार्‍या सृष्टी भोसले, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सुमन, गुरू जांभळेश्वर विद्यापीठ हिसार यांनी पदके मिळवली. ५३,५७ व ६२ या वजनी गटातील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे पदके देवून सन्मानित करण्यात आले. पदक विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार सोहळ्याला बारामती अ‍ॅग्रोच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार, कर्जतच्या नगराध्यक्ष सौ. ऊषाताई राऊत, मंजुषाताई गुंड, कर्जत नगरपंचायतच्या नगरसेवक, नगरसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!