सोलापूर झेडपीच्या १ हजार धोकादायक वर्गखोल्या पाडकामाचे भिजत घोंगडे!
सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक वर्गखोल्या पाडकामाचे काम सध्या रखडले आहे. या शाळाकडे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पैसे नसल्यामुळे या वर्ग खोल्याच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या धोकादायक वर्ग खोल्या समोरच बसावे लागत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक हजाराहून अधिक वर्ग खोल्या या धोकादायक आहेत. या वर्गखोल्या पाडकामासाठी शाळांनी शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केला आहे. परंतु या वर्गखोल्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यास शिक्षण विभागाने ज्या त्या शाळांना सांगितले आहे. मात्र अनेक शाळांकडे पैसे अभावी स्ट्रक्चरल ऑडिट करणे राहिले आहे. एक हजाराहून अधिक वर्ग खुल्या धोकादायक असल्याने यापैकी जवळपास २० ते ३० वर्ग खोल्याचेच स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले आहेत. उर्वरित एक हजाराहून अधिक वर्ग खोल्याचे अद्याप स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले नाही. त्यामुळे या वर्गखोल्याचे पाडकाम सध्या थांबले आहे. विशेषता एक वर्ग खोली पाडकासाठी जवळपास पाच हजार रुपये लागतात. त्यामुळे या पाच हजार अभावी अनेक विद्यार्थ्यांना जीव धोक्यात असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, या धोकादायक वर्ग खोल्यांमध्ये सध्या विद्यार्थी बसत नाहीत. परंतु दुपारच्या सुट्टीमध्ये अनेक विद्यार्थी वरांड्यामध्ये जेवणाचा डबा खाण्यासाठी बसतात. अशावेळी जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबरच सध्या जिल्हा परिषदेच्या अनेक नव्याने बांधकाम केलेल्या वर्ग खोल्या समोर या धोकादायक इमारतीमुळे शाळेची शोभा कमी होत आहे.
आमच्याकडे ज्या धोकादायक वर्ग खोल्या आहेत, त्याबाबत शाळांनी प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव आम्ही बांधकाम विभागाकडे पाठवून आता ज्या त्या शाळांनी स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे आहे. त्यानंतरच धोकादायक वर्ग खोल्या पाडता येणार आहे.
– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी
तालुकानिहाय धोकादायक वर्ग खोल्या
– अक्कलकोट ८६
– बार्शी ५३
– करमाळा ७८
– माढा ७८
– माळशिरस २६७
– मंगळवेढा ८२
– मोहोळ ८३
– पंढरपूर १४३
– सांगोला १११
– उत्तर सोलापूर ११९
– दक्षिण सोलापूर ९२
– एकूण ११९२
——————–