आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मेदनकरवाडीत पौष पौर्णिमादिनी श्र खंडोब आणि श्री म्हाळसादेवी यांचा लग्न सोहळा अंतर्गत शाकंभरी पौर्णिमा उत्साहात परंपरेने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यासाठी एक दिवस आदी हळद देखील महिलांनी परंपरेने दळली. श्रींचे सोहळ्यात श्रींची पूजा, मंदिर व परिसर लक्षवेधी सजावट करण्यात आली. होती. लग्न सोहळ्यास परिसरातील हजारो भाविकांचे उपस्थितीत श्री खंडोबा महाराज व श्री म्हाळसादेवी यांचा लग्न सोहळा धार्मिक वातावरणात परंपरेने पार पडल्याची माहिती अरुण तोडकर, नवनाथ भुजबळ यांनी दिली.
यावर्षीही लग्न सोहळा प्रथा परंपरांचे पालन करीत परण्या तालासुरात सनई चौघडे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाद्यवादनासह सोहळा उत्साहात पार पडला. श्री खंडोबा महाराज व श्री म्हाळसादेवी यांचा लग्न सोहळा पार पाडण्यासाठी खंडोबा महाराज यांचे सेवेकरी अरूण तोडकर, शशीकांत भुजबळ, शिवराम भुजबळ, गोरक्षनाथ मेदनकर, अशोक लोखंडे यांनी काम पाहिले. यावेळी श्रीमती अंजली भुजबळ, परीका मेदनकर, सिंधू भुजबळ आदी महिलांनी हळद दळण दळणाची प्रथा परंपरेने पालन करीत हळद दळली. संध्याकाळी श्री खंडोबा महाराज, म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा परंपरेने धार्मिक, मंगलमय वातावरणात पार पडला. मच्छिंद्र भुजबळ व जगन्नाथ भुजबळ यांनी मंगलअष्टकांचे गायन केले. लग्न सोहळा झाल्यानंतर भक्त लोकांच्या अंगात अनेक वारी आली. त्यानंतर आरती, महाप्रसाद वाटपाने लग्न सोहळ्याची सांगता झाली.