बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी)नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांची सुटका होते ना होते तेच शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना खतासाठी कृषी केंद्रावर रांगा लावाव्या लागत आहे . हे होत नाही तोच ट्रॅक्टरने पेरणीसाठी लागणाऱ्या डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने चिखली येथे शेतकऱ्यांना पेट्रोल पंपासमोर रांगा लावाव्या लागत आहे
कृषिप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची ही थट्टाच म्हणावी लागेल. सर्वच राजकीय पक्ष व संघटना राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीच्या चर्चेमध्ये दंग आहेत ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहेत आणि ज्या देशात कृषिप्रधान देश म्हणून संबोधले जाते त्याच देशांमध्ये आज शेतकऱ्यांना पेरणी लागणारे खत वेळवर व अपेक्षित मिळत नाही त्यासाठी काही व्यापाऱ्या कडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे आणि कृषी केंद्रासमोर रांगा लावून शेतकऱ्यांना खत विकत घ्यावे लागत आहे. आता खता पाठोपाठ पेरणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे तज्ञ व राजकारणी सांगतात . जो शेतकरी बैल जोडी वरून आता ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी करू लागला त्या ट्रॅक्टरला चालवण्यासाठी लागणारे डिझेल मात्र मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. डिझेल पंपावर डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पेरणी संकटात सापडली आहे यासाठी चिखली येथे शेतकऱ्यांना डिझेल पंपावर रांगा लावून मर्यादित डिझेल मिळत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
पूर्वी ग्रामीण भागामध्ये अशी अशी पद्धत होती की पेरणीच्या वेळी जर कोणी जवळचा व्यक्ती मरण पावला तरी त्याचे प्रेत झाकून ठेवून पहिली पेरणी करण्यात येत होती आणि नंतर त्याचेवर अंतविधी करण्यात येत होते. एवढे महत्व पेरणीला आणि पेरणीच्या वेळेला बळीराजा देत होता कारण पेरणी अशी व्यवस्था आहे. ती संपूर्ण निसर्गाच्या धोरणावर आणि वळणावर पेरणी करावी लागते एकदा का पेरणीचा मौसम निघून गेला. तर वर्षभर त्या शेतामध्ये शेतकऱ्याला अपेक्षित उत्पादन घेता येत नाही म्हणून पेरणी ही शेतकऱ्यांच्या वार्षिक नियोजनातील महत्त्वाची वेळ आहे. आणि याच वेळे मध्ये ख तर व डिझेल मिळत नसल्याने खंड पडत आहे हे राज्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे आणि इथल्या व्यवस्थेने सुद्धा समजून घ्यायला हवे