राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार?
– सुरतमधील एका हॉटेलात मुक्कामी असल्याने खळबळ
– संजय गायकवाड, डॉ. रायमुलकरदेखील नॉट रिचेबल
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – विधानपरिषद निवडणुकीत तब्बल २० मते फोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात असल्याचे सिद्ध करणार्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता हे सरकार पाडण्यासाठी निर्णायक हालचाली सुरु केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. शिवसेनेचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार काल रात्रीपासून नॉट रिचेबल असून, ते गुजरातमधील सुरत येथे एका हॉटेलात असल्याचे खात्रीशीररित्या हाती आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज बोलावलेल्या बैठकीला हे आमदार हजर राहणार नाहीत.
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हेदेखील रात्रीपासून नॉटरिचेबल असून, तेदेखील या आमदारांसोबत असल्याने बुलडाणेकरांना धक्का बसला आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे पक्ष प्रतोद व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना हायकमांडने दिल्लीत बोलावले असून, सविस्तर अहवाल मागवला आहे. थोरात हेदेखील पद सोडण्याच्या मनस्थितीत पोहोचले आहे. महाविकास आघाडीत अभूतपूर्व पेच निर्माण झाला असून, हे सरकार कोणत्याहीक्षणी कोसळेल, असे भाकित वरिष्ठ राजकीय नेते खासगीत बोलताना व्यक्त करत आहेत.
(वाचकांसाठी सविस्तर आणि कन्फर्म न्यूज लवकरच देत आहोत)