BuldanaCrimeVidharbha

मेहकर येथील अश्लिल व्हिडीओ व्हायरल प्रकरण पीडित महिलेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) मेहकर येथील अश्लिल व्हिडीओ व्हायरल प्रकरणी माजी स्विकृत नगरसेवकाविरूध्द पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडित महिलेने जिल्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून २० जून रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता मात्र तरीही पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज २० जून रोजी पीडित महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास विषारी औषधाची बाटली घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत असे की, मेहकर येथे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे १७ मे रोजी पीडित महिलेने पोस्टेला तक्रार देत माजी स्विकृत नगरसेवक विकास विजय जोशी वय ५४ वर्षे रा. रामनगर मेहकर ता. मेहकर जि. बुलडाणा याने पीडित महिलेच्या मुलांना नोकरीवर लावून देतो, तुझे सोबत लग्न करतो असे आमिष दाखवून महिलेला १७ मे चे पूर्वी १० ते १२ वर्षापासून महिलेसोबत मेहकर बायपास वरील लॉजवर व विकास जोशीचे फार्म हाउसवर महिलेच्या इच्छेविरुध्द वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले व माझे शरीर संबंध करतांनाचे व्हिडीओ शुटींग काढून माझा अश्लिल व्हिडीओ ला मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप व्दारे व्हायरल करुन फिर्यादीची समाजात बदनामी केली, असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी माजी स्विकृत नगरसेवक विकास जोशी विरूध्द अप.नं व कलम- २७९/ २०२२ कलम ३७६,३७६ (२) (एन) ३५४ (सी), ४१७, २९२ भांदवीसह कलम ६७,६७ (अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारणा अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मेहकर पोलिसांनी गुुन्हा नोंदवूनही आरोपी विकास जोशीला अटक केली नव्हती. त्या संतप्त पीडित महिलेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून २० जून रोजी महाराष्ट्रात कोठेही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलीस महिलेचा शोध घेत होते. दरम्यान आज २० जून रोजी पीडित महिला आत्मदहनासाठी विषारी औषधाची बाटली घेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली असता महिला पोलिसांनी वेळीच झडप घालून पीडित महिलेला ताब्यात घेतले व तिच्याजवळची विषाची बाटली जप्त करण्यात आली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी परिसरात एकख्च खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेस ताब्यात घेवून पुढील तपास करून कारवाई सुरू होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!