ChikhaliVidharbha

चिखली येथे साकारणार प्रभू विश्वकर्मा यांचे भव्य मंदीर!

चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली या ऐतिहासिक शहरात विदर्भातील सर्वात सुंदर असे सृष्टीचे रचनाकार प्रभू विश्वकर्मा यांचे मंदीर साकारण्याचा संकल्प सुतार समाज बांधवांनी नववर्षाच्या सुरूवातीला सोडला आहे. यासंदर्भात या मंदिरासाठी जागा दान करणारे दानकर्ते मुकेश सुरूशे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या संकल्प सभेला मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी हजेरी लावली. प्रत्येक समाज बांधवाने स्वकष्टातून मंदिरासाठी अर्थसहाय्य द्यावे, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सुतार समाजासह पांचाळ समाजाचे आद्यदैवत असलेल्या प्रभू विश्वकर्मा यांचे चिखली शहरात भव्य मंदीर असावे, असा सुतार समाजातील जाणकारांचा हेतू असून, याकामी मुकेश सुरूशे यांनी आपली लाखो रुपयांची जागा मंदिरासाठी समाजाला दान दिली आहे. खंडाळा रोडला हे मंदीर नियोजित आहे. लोकवर्गणी व समाजातील दानशुरांच्या अर्थसहाय्याने हे मंदीर उभारले जावे, असा निर्धार नुकत्याच झालेल्या संकल्प सभेत व्यक्त करण्यात आला. काल झालेल्या बैठकीला जागा दानकर्ते मुकेश सुरूशे, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. सुरूवातीला प्रभू विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून संकल्प सभेला प्रारंभ झाला व विविध निर्धार व्यक्त करण्यात आले. सुतार समाज हा कष्टकरी व सात्विक समाज असून, आपल्या कष्टाच्या पैशातूनच मंदीर उभारणीचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याच बैठकीत, विष्णूपंत काळे ७०००, प्रमोद सूर्यवंशी १०००, कैलासराव जवंजाळकर १०००, भागवतराव सोनुने २०००, उमाकांत सोनुने २०००, भगवानराव उगवे १०००, मुकेश सुरुशे १०००, अनंतराव राऊत ५००, गोपाल खोलगडे १००१, रामेश्वर पगारे १०००, सचिन देशमुख १००० संदेश सुरूशे व शंतनु सांगळे यांनी प्रत्येकी ५०० रुपये देणगी दिली. तसेच, यासंदर्भात सुतार समाजाचे क्रियाशील व युवा कार्यकर्ते विनोद खोलगडे यांनी समाजातील उद्योजक व ज्येष्ठ पत्रकार- संपादक पुरूषोत्तम सांगळे यांच्याशी संपर्क साधून, या मंदिरासंदर्भात माहिती दिली असता, त्यांनीही लगेचच १००१ रुपयांची वर्गणी दिली. तसेच, या मंदिरासाठी राज्यभरातून जास्तीत जास्त निधी प्राप्त करून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीला प्रमोद सूर्यवंशी, कैलास जवंजाळकर, श्रीराम वानखेडे, मुकेश सुरूशे, भगवानराव उगवे, भागवत सोनुने, वसंता खराटे, उमाकंत सोनुने, गोपाल खोलगडे, माधवराव इंगळे, श्रीकांत उगवे, गजानन सोळुंके, विनोद खोलगडे व अनंत राऊत यांच्यासह बहुसंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे, चिखलीतील एक स्वयंघोषित व बढाईखोर, समाजातील परंतु बारा बलुतेदारांचा म्हणून घेणारा नेता मात्र या बैठकीकडे फिरकलादेखील नाही.


दयानंदजी थोरहाते यांच्याकडून कलशारोहण होईपर्यंत दरमहा १००० रुपयांचे दान

निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास माऊलींचे पुतणे व शिक्षक दयानंद थोरहाते (हिवरा आश्रम) यांनी अनोखा संकल्प सोडत लगेचच १००० रुपयांचे दान तर दिलेच; पण या प्रभू विश्वकर्मा मंदिराचे कलशारोहण होईपर्यंत दरमहा १००० रुपयांचे दान देण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!