वंजारी सेवा संघाचा रत्नागिरीत राज्यस्तरीय दशकपूर्ती सोहळा व समाज मेळावा
– १ जानेवारीरोजी रत्नागिरीतील वीर सावरकर सभागृहात आयोजन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या राज्यातील अग्रगण्य सामाजिक संघटनेचा दशकपूर्ती सोहळा व राज्यस्तरीय वंजारी समाज मेळावा यावेळी रविवारी (दि.१ जानेवारी) वीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. राष्ट्रधर्म, अध्यात्म व समाजसेवा या ब्रीदवाक्य प्रमाणे संघटनेचे बिगरराजकीय स्वरूपाचे सामजिक काम मागील दहा वर्षापासून राज्याच्या ३६ जिल्ह्यात सुरू आहे. समाजातील सर्व स्त्री-पुरुषांनी या मेळाव्यास हजर राहण्याचे आवाहन संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल जाधववर यांनी केले आहे.
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेची स्थापना सन २०१२ साली श्री क्षेत्र भगवानगड येथे करण्यात आली होती. राष्ट्रसंत भगवानबाबा, संत वामनभाऊ, संत आवजीनाथ महाराज व लोकनेते वसंतराव नाईक साहेब, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना आदर्श मानून संघटनेने राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात आपल्या कार्यकारिणीचा विस्तार करून वंजारी समाजाला संघटित करण्याचे काम केले आहे. संघटनेत शासकीय निमशासकीय कर्मचार्यांसोबत सामाजिक, वैद्यकीय उद्योग, कला, साहित्य क्षेत्रात काम करणारे समाजबांधव मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. मागील दहा वर्षात संघटनेने श्री क्षेत्र भगवानगड, बार्शी, नवीमुंबई, औरंगाबाद, आळंदी, बीड, लातूर, जालना, पुणे, नागपूर, नंदुरबार, वर्धा, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, नाशिक या शहरात समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. मागील काही वर्षात संघटनेने समाजातील गुणवंतांचा सत्कार, नवनियुक्त अधिकारी वर्गाचे सत्कार, युवकांना रोजगार व व्यवसायासाठी मार्गदर्शन, वधू वर परिचय मेळावा, रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सोबतच भटके विमुक्त- ओबीसी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणे, महाज्योतीच्या प्रश्नावर राज्यभरात निवेदन देणे, अशा प्रमुख विषयावर महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. वंजारी सेवा संघ संघटनेला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने दशकपूर्ती सोहळा व समाज मेळावा रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थित आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भटके विमुक्त चळवळीचे अभ्यासक तथा सदस्य नीती आयोग भारत सरकार श्री दादा इदाते, ओबीसी चळवळीचे मार्गदर्शक माजी आमदार डॉ. नारायण मुंडे, माजी आमदार तोताराम कायंदे, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, माजी उपनगराध्यक्ष डॉ. दीपाताई गीते मॅडम, ओबीसी राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र राख व ओबीसी राज्य समन्वयक अरुण खरमाटे यांची उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ‘भटके विमुक्त चळवळ व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब’ या विषयावर श्री दादा इदाते, तर ‘ओबीसी चळवळ व वंजारी समाज’ या विषयावर माजी आमदार डॉ. नारायण मुंडे यांचे मार्गदर्शन होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन वंजारी सेवा संघाच्या कोकण विभागीय कार्यकारिणीने केले असून, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. शंकर मुंडे, कोकण विभागीय अध्यक्ष मोहनराव नागरगोजे, प्रदेश संघटक नितीन गर्जे, प्रदेश सल्लागार राजेंद्र धात्रक, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नागेश जाधवर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. अच्युतराव वणवे, रायगड जिल्हाध्यक्ष गोरख आघाव यांच्यासह कोकण विभागातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंजारी सेवा संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेश कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, प्रदेश महासचिव बाजी दराडे, प्रदेश उपाध्यक्ष अमोल कुटे, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष डॉ.मंजुषाताई दराडे, महिला प्रदेश कार्याध्यक्ष सविताताई मुंडे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश आव्हाड, युवा प्रदेश कार्याध्यक्ष नितीन सांगळे, मुंबई ठाणे विभाग अध्यक्ष बाळाजी केंद्रे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मानसिंगराव माळवे, मराठवाडा अध्यक्ष अॅड. संजय काळबांडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसाट, पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. शेषराव खार्डे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष विष्णू डिघुळे यांच्यासह वंजारी सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस संघटन बिभीषण पाळवदे, सूर्यकांत मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर मुंडे, विशाल बुधवंत, संतोष ताठे, डॉ. अमोल गीते, अनिल काहाळे, भाऊसाहेब मिसाळ, प्रा. डॉ. शंकर मुंडे, अभिनय गिते, भास्कर लहाने, प्रदेश संपर्क प्रमुख भाऊसाहेब घुगे, डॉ. कांचनकुमार चाटे, संभाजीराव शिरसाट, प्रा. बाजीराव काकड, प्रा. गुणवंत जाधवर, दिनेश केकान, डॉ. अमोल कुटे, राजेंद्र दराडे पाटील, लक्ष्मणराव उगलमुगले, सुग्रीव मुंडे, प्रदेश सहसचिव प्रा. डॉ. विठ्ठल घुले, आनंद संखे, शामराव गीते, डॉ. नारायण जायभाये, प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये, अॅड. संजय काळबांडे, बाळाजी केंद्रे , प्रदेश चिटणीस प्राचार्य विक्रम बोडखे, गजानन डोईफोडे, अरुण खरमाटे, शिवाजी बडे, प्रदेश संघटक भास्करराव बोदर, धनंजय मुंडे, देविदास पेटकर, नितीन गर्जे, रामभाऊ साठे, प्रदेश सहसंपर्क प्रमुख चंचल साळवे, प्रा. नरेंद्रकुमार सोनुने, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख जितेंद्र ढाकणे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख संतोष कांदे, बाळासाहेब जाधवर, प्रदेश कार्यालय प्रमुख माणिक शिरसाट, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र दराडे, सिद्धेश्वर मुंडे, लक्ष्मण मिसाळ, विनायकराव बडे, अभिजित माळवे यांनी केले आहे.
——————-