– काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५५ ग्रामपंचायतींवर सरपंच
सोलापूर (संदीप येरवडे) – यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना मोठी ताकद लावावी लागली. त्यामुळे जिल्ह्यात भाजपकडे ७७ ग्रामपंचायती ताब्यात आले आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जवळपास ५५ ग्रामपंचायती वर सरपंच निवडून आले आहेत.
आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका जरी वेगवेगळ्या असल्या तरी गाव पातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठी चुरस असते. हे या निवडणुकी मधून दिसून आले. कारण भावकी आणि गावकी मध्ये या निवडणुकीचे वातावरण तापलेले असते. सकाळपासूनच जिल्ह्यातील ज्या त्या तालुक्यामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण १८९ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजप पक्षाकडे ७७ ग्रामपंचायती ताब्यात आले असल्याचा दावा केला जात आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये भाविकास आघाडीने प्रसंगी मारली असल्याचे दिसत आहे. तर अक्कलकोट तालुक्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाने अनेक जागेवर सरपंच निवडून आले आहेत. अनेक ग्रामपंचायत मध्ये काही जागेवर ठाकरे गट तर काही जागेवर शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. स्थानिक पातळीवरील आघाड्यां करून जवळपास २३ जागेवर सरपंच निवडून आले आहेत .
निवडून उमेदवारांनी विजय जल्लोष साजरा केला.
कुणाला किती सरपंचपदे
– भाजप ७७
– काँग्रेस १४
– राष्ट्रवादी काँग्रेस ४१
– शिंदे गट २६
– ठाकरे गट ८
– इतर २३
– एकूण १८९
दक्षिण सोलापूर मधील वांगी गावामध्ये पीर महादेव पॅनलचा दणदणीत विजय
– होनमुर्गीत नंदी बसवण्णा ग्राम विकास पॅनलची सत्ता
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपसह वांगी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जोर लावला होता. परंतु त्यांच्या गटाच्या सरपंचांना पराभव पत्करावा लागला आहे. वांगी ग्रामपंचायतमध्ये ग्रामदेवत पीर महादेव परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. तर मंद्रूप ग्रामपंचायतीमध्ये कोरे घराण्याला पुन्हा मतदारांनी स्वीकारले आहे.
वांगी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे या ८६ मताने निवडून आल्या आहेत. माजी सहकार मंत्री देशमुख यांनी वांगी ग्रामपंचायत मध्ये ग्रामदैवत महादेव परिवर्तन पॅनलला पाडण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु त्यांचे प्रयत्न फसले असल्याची माहिती सुरज खडाखडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली. याबरोबर होनमुर्गी बिरनाळ ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुभाष तेली हे थेट जनतेतून सरपंच झाले आहेत. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी याप्रसंगी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी निवडून आलेल्या सरपंच यांच्यासह सदस्य त्यांच्या समवेत गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. धोत्री ग्रामपंचायतमध्ये सर्वपक्षीय पॅनल असलेल्या नागनाथ ग्रामविकास पॅनलच्या सरपंच वैशाली संजीव पाटील यांचा विजय झाला आहे थेट जनतेतून सरपंच असल्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.
———–
नंदी बसवण्णा ग्राम विकास पॅनल
होनमुर्गी बिरनाळ ग्रुप ग्रामपंचायत
निवडून आलेले सदस्य सरपंच सुभाष तेली, सदस्य – परमेश्वर वाघमारे, मुबारक निंबाळे, श्रीकांत स्वामी, अनिता हडपद, लक्ष्मी गायकवाड, महबूब सुभानी
———
वांगी ग्रामपंचायत
ग्रामदैवत महादेव परिवर्तन पॅनल
निवडून आलेले सदस्य – सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे (एसटी महिला राखीव) अरुणा जवळकोटे, ओम प्रकाश सुज्ञानी, भगवान सोनवणे आदी सदस्य निवडून आले आहेत.
———–
धोत्री ग्रामपंचायतीवर नागनाथ ग्राम विकास पॅनलचा झेंडा
निवडून आलेले सदस्य सरपंच वैशाली संजू पाटील (सर्वसाधारण गट) सदस्य – सूर्यकांत यारगले, सैफ शेख, बाळासाहेब नवगिरे, सुधीर चौगुले, रेखा स्वामी, ललिता चौगुले, सुरेखा डमडरे, रहिमा पठाण आदी सदस्य निवडून आले.
—————–