बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा तालुक्यातील चिखला ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलने काँग्रेसचा धुव्वा उडवत, एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. या ठिकाणी विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ यांचे सुपुत्र अॅड. पराग वाघ यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विजय रमेश वाघ यांच्यावर २८५ मतांनी विजय संपादन केला. विशेष म्हणजे सदस्यपदाच्या सातही जागा भाजपानेच पटकावल्या!
चिखला ग्रामपंचायतची निवडणूक रविवार १८ डिसेंबर रोजी पार पडली होती, त्यात ८५३ जणांनी मतदान केले होते. आज मंगळवार २० डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत अॅड.पराग राजेंद्र वाघ यांना ५३८ तर विजय रमेश वाघ यांना ३१५ मते मिळालीत. त्यामुळे अॅड.पराग वाघ हे २८५ मतांनी विजयी झाले.
सदस्य पदासाठी वार्ड क्र.१ मधून सदस्य म्हणूनही अॅड. पराग राजेंद्र वाघ निवडून आले, त्यांच्यासह सविता गणेश वाघ व विजय सुरुशे वार्ड क्र.२ मधून परमेश्वर जालींधर इंगळे व गिता मुवुंâद सावळे तर वार्ड क्र.३ मधून अण्णा गंगाराम वाघ व मिरा विजय सुरुशे विजयी झाल्यात. म्हणजेच मागासवर्गीय प्रवर्गातून मिरा विजय सुरुशे ह्या दोन ठिकाणी विजयी झाल्यात. तर अॅड.पराग वाघ हे सरपंच व सदस्य म्हणूनही निवडून आलेत. या निवडणूकीची सर्व धुरा डॉ.राजेंद्र वाघ यांनी हाती घेतली होती, हे येथे विशेष!