मराठवाड्यांची साखर गोड नाही का? बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटलांचा संतप्त सवाल!
उस्मानाबाद (विठ्ठल चिकुंद्रे) – पश्चिम महाराष्ट्रातील उसाला तीन हजार रुपये दर आहे, मराठवाड्यातील शेतकर्यांच्या उसाला २ हजार रुपये दर आहे. उसदरात एवढी मोठी तफावत का, मराठवाड्याचा ऊस गोड नाही का, की तिखट आहे? असा संतप्त सवाल बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला. साखर कारखाने व्यवस्थित भाव देत नसतील तर, कारखाने बंद पाडा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
उमरगा तालुक्यातील कवठा येथे आज ग्रामपंचायत कार्यालयाचा सभागृहात भव्य किसान क्रांती परिषद पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील, शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिंकदरभाई शहा, कृषिभूषण गोविंदराव पवार, भारत विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विनायकराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे, शेतकरी नेते माणिकराव कदम, प्रा.दिलीप गरुड, माजी सभापती गोविंदराव पवार, विजयकुमार सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जिंतेद्र शिंदे, सरपंच विकास पाटील, माऊली जवळेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मुलांपैकी शुभम केदारी आळणी फाटा व केशव मदने बोरी या दोन्ही मुंलाना आहेर व आर्थिक मदत विनायकराव पाटील यांनी दिली. भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, बलभिम पोतदार, नितीन पाटील, मंलग गुरुजी, केशव पवार, धर्मराज सोनवणे, गणेश पाटील, यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कमलाकर भोसले यांनी केले. यावेळी कवठा परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
—————–