मुंबई/शिर्डी (विशेष प्रतिनिधी) – आरोग्य विभागातील सुटकेचा निःश्वास सोडावा, अशी बातमी आहे. आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची आरोग्य खात्यातून बदली झाली असून, शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)पदी त्यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या दीड वर्षात बानायत यांच्यात आणि ग्रामस्थांमध्ये अनेकवेळा वाद झाले होते. तथापि, देवस्थानमधील प्रशासकीय शिस्त त्यांनी चांगल्या प्रकारे लावली होती.
मागील महिनाभरातच आरोग्य विभागात आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली होती. या महिनाभरात त्यांनी आरोग्य विभाग चांगलाच वठणीवर आणला होता. तथापि, राज्य सरकारने आज अचानक तुकाराम मुंढे यांची बदली केली आहे. त्यामुळे मुंढे यांच्या धडक कारवायांच्या मोहिमेला धास्तावलेले आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आज राज्य सरकारने सहा आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्यात, त्याच साई संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्डच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, तर साई संस्थानच्या सीईओपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत कडकशिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे हे शिर्डीत साईचरणी आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले असले तरी, प्रशासकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे.
सहा भा. प्र. से. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे:
०१. श्रीमती भाग्यश्री बानाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर या पदावर.
०२. श्री व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.
०३. श्रीमती सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.
०४. एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर.
०५. श्री एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.
०६. श्री तुकाराम मुंढे, आयुक्त कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची बदली –
साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी
.