AalandiHead linesMaharashtra

अलंकापुरीत हैबतबाबा पायरी पूजन सोहळा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी दिन सोहळा यावर्षी कोरोना काळामुळे उशिरा आळंदी देवस्थान सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त कार्तिकी यात्रेस भाविक राज्य परिसरातून आळंदीत दिंड्यांदिंड्यांतून हरिनाम गजरात दाखल झाले आहेत. आळंदी कार्तिकी यात्रेस गुरुवारी ( दि.१७ ) हैबतबाबा पायरी पूजनाने कार्तिकी यात्रेस सुरुवात होणार असल्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार यांनी सांगितले.

यासाठी भाविकांचा ओघ आळंदीकडे सुरूच आहे. हजारो भाविक आळंदीत दाखल झाल्याने आळंदीत विविध ठिकाणी हरिनाम गजर सुरू झाला आहे. राज्यातून येणाऱ्या भाविकांसह नागरिकांची यात्रा काळात गैरसोय होऊ नये यासाठी आळंदी नगरपरिषदेने विविध नागरी सेवा सुविधां देण्यासह उपाय योजना केल्या आहेत. नगरपरिषद प्रशासन भाविकांचे स्वागतास सज्ज असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व प्रशासक तथा तहसीलदार खेड वैशाली वाघमारे यांनी सांगितले.  आळंदीत कार्तिकी यात्रा काळात सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी आळंदी नगरपरिषदेने पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचना प्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांताधिकरी विक्रांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी केली आहे. यात्रा काळात भाविकांना नागरी सुविधा या अंतर्गत देण्यात येणार असून नागरी सेवा सुविधा देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
पाणी पुरवठा विभागाचे माध्यमातून कार्तिकी यात्रेच्या कालावधीत २४ तास पंपिग चालु ठेवुन झोन पध्दतीने पुरेशा प्रमाणात नियमित शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा केंद्रामधील मशिनरी, मोटार्स इत्यादी सुस्थितीत ठेवण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,पुणे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. तांत्रिक अधिका-यांचे मार्गदर्शनाने पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. आळंदीला आता थेट भामा आसखेड धरतील पाणी बंधिस्त पाईप लाईन मधून पुरवठा होत असल्याने भाविकांच्या पिण्याचे पाण्याची गैरसोय दूर झाली आहे.आळंदी शहराकरीता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांचेकडे देखील मागणी करण्यात आली आहे. पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.या शिवाय शासकीय पाण्यााचे टॅकर, खाजगी पाण्याचे टँकर भाड्याने घेण्यात आले असून ते ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले असल्याचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अक्षय कुमार शिरगिरे यांनी सांगितले.

अलंकापुरीत अतिक्रमण हटाव मोहिमेने रस्ते प्रशस्त

पिंपरी चिंचवड महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलिस यंत्रणा, वाहतूक पोलीस यांचे मार्फत संयुक्त अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. रहदारीला अडथळा होणार नाही, याची यातून दक्षता घेण्यात येत असल्याचे वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी सांगितले.

अलंकापुरी प्रकाश झोताने उजळली

संपूर्ण आळंदी शहरात रस्त्यावरील दिवाबत्ती प्रभावी ठेवण्याचे नियोजन केले असून याची तयारी पूर्ण झाली आहे. इंद्रायणी नदी घाट, प्रदिक्षणा रस्ता व शहरा अंतर्गत रस्ते, आवश्यक त्या ठिकाणच्या रस्त्यावरील नादुरूस्त विदयुत दिवे युध्द पातळीवर दुरूस्त करून बसविण्यात आले आहेत. प्रदक्षिणा मार्ग, शहरा अंतर्गत असलेले चौक, इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेट आळंदी दी ठिकाणी फ्लडलाईट (व्हाईट फोकस) लावुन जादा विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विद्युत विभाग प्रमुख साधना शिंदे यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

नगरपरिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व शासकिय खात्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी संपर्क यंत्रणा उपलब्द्ध करून देण्यात आली आहे. विविध खात्या मार्फत यात्रा काळात केलेल्या नियोजनाचा आराखडा, नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे नियुक्त केलेल्या वेळे प्रमाणे नांव व संपर्काची यादी ठेवण्यात आली आहे.

सोहळ्यावर सी.सी.टी.व्ही ची नजर

कार्तिकी यात्रा काळात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी विविध ठिकाणी शहरात सी.सी.टी.व्ही ची यात्रेवर नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी पोलिस ठाण्यात तसेच आळंदी नगरपरिषद कार्यालयातून यात्रा व गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. पब्लीक अॅडरेस सिस्टिम वॉकी-टॉकी शहरात कार्यरत ठेवण्यात आली आहे. संपुर्ण शहरामध्ये सुचना व हरविलेल्या व्यवक्तींची माहिती देण्यासाठी केंद्रीय सुचना यंत्रणा बसविण्यात आली आहे. यात्रा काळात भाविक भक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविणे बाबत तसेच इतर शासकिय यंत्रणा संपर्क साधण्यास सूचना देण्यासह नियोजन करण्यात आले असल्याचे आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.
आळंदी हे स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदी साठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता सफाई ठेकेदार आणि पालिकेचे कामगार यांचे वतीने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. आळंदी शहरातील तुंबलेली गटारे, कचरा कुंड्या स्वच्छ ठेवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. विल्हेवाट लावणे, पावडर व आवश्यक ते जंतुनाशके फवारणे तसेच फॉगिंग चे शहरात काम सुरु झाले आहे. धुराडी फवारणी प्राधान्याने करण्यात आली आहे. नगरपरिषदेने अनेक ठिकाणी मोबाईल टॉयलेट बसविले आहे. चाकण चौक, शाळा क्र.१, नगरपरिषदेच्या ग्राऊंडवर सुलभ शौचालय कार्यरत ठेवले आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शेकडो शौचालय, नगरपरिषद शाळा क्र.४ ,एस.टी.स्टॅंडचे मैदानात, नविन पुला लगत, सिध्दबेटाकडे जाणा-या रस्त्याच्या कडेने जादा शौचालयाची उभारणी करुन स्वच्छते बाबत व्यवस्था केली असल्याने शहरात आरोग्य सेवेसह यात्रा नियोजनातून नगरपरिषद भाविकांचे स्वागतास सज्ज झाली असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!