आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चऱ्होली येथील गायत्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थापक अध्यक्ष विनायकराव भोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिनाचा सर्व युनिट मध्ये उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त सरिता विखे पाटील यांनी भूषविले. मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे गीत गायन केले. पारंपारिक वेशभूषेतील बालचमुंनी उपस्थितांची मने जिंकली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नृत्य करत दिलेली अनोखी भेट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आपल्या शिक्षकांकडून मिळालेल्या या अनपेक्षित भेटीने सर्व विद्यार्थ्यांची मने प्रफुल्लित झाली. विद्यार्थ्यांसह प्राचार्या, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.