आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील पोलिस मित्र वेलफेयर फाउंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने आळंदी कार्तिकी यात्रेत पोलीस मित्र सेवेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याबाबत पदाधिकार्यांनी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदन देऊन या संदर्भात चर्चा केली. या प्रसंगी पोलिस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवाजी जाधव, पश्चिम महाराष्ट्र ज्वॉइंट अध्यक्ष बाळासाहेब मुंगसे, प.म. उपाध्यक्ष भागवत काटकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद धनवे, खेड तालुका उपाध्यक्ष तुषार मुंगसे, सोशल मिडिया कमांडर वैभव दहिफळे, कमांडर संदिप चोपडे, कमांडर रूपेश मेंगे, किरण भिवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
१७ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आळंदीत कार्तिकी यंत्रे अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. यावेळी यात्रेस लाखो भाविक येणार असल्याने भावी, नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त आणि पोलीस मित्र मदतीला तैनात राहणार आहे. यासाठी या विषयावर संवाद साधत चर्चाच करण्यात आली. कार्तिक यात्रा काळात बंदोबस्त कशा पद्धतीने द्यायचा, तसेच काय काळाजी घ्यायची, आणि कोणते महत्त्वाचे प्वॉइंट आहेत. त्यावर माहिती घेत संवाद साधण्यात आला. यात्रेत दुर्घटना तसेच चोर्या कशा रोखायच्या या विषयावर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या मदतीची पोलिस प्रशासनास फार गरज असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले. आपल्या सर्व कमांडोना वैयक्तिक ओळखपत्र, युनिफॉर्म व टोपी हे महत्त्वाचे आहे. हे निदर्शनात आणून देण्यात आले.