लोणार (विनोद पाटील तेजनकर) – ऐन दिवाळीत गोरगरिबांना सण गोड व्हावा म्हणून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, तेल असे अन्नधान्य देण्याची आनंदाचा शिधा ही कीट आणली होती. परंतु, अन्न धान्य वितरण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे रेशन दुकानांवर ही कीट पोहोचलीच नव्हती. तसेच, सर्व्हर डाऊन झाल्यानेदेखील वितरण झाले नव्हते. शेवटी गोरगरिबांची दिवाळी साधीसुधीच साजरी झाली होती. आता वराती मागून घोडे नाचवत ही कीट गोरगरिबांना वाटप केली जात आहे. दिवाळी संपून महिना होत आल्यानंतर आता कुठे शिवणी पिसा येथे ही कीट मिळत आहे.
सविस्तर असे, की गरीब लोकांची दिवाळी यावर्षी गोड व्हावी म्हणून शासनातर्पेâ स्वस्त धान्य दुकानात शंभर रुपयांमध्ये एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर अशा प्रकारची ‘आनंदाचा शिधा ‘ किट म्हणून दीपावली सणाला देण्यात येणार होती. परंतु अनेक अडचणीमुळे दिवाळीच्या दिवशी ही सामान असलेले किट मिळू शकली नाही. त्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त करण्यात आला होता. परंतु दिवाळी हा सण झाल्यानंतर उशिरा का होईना ‘आनंदाचा शिधा’ सामान असलेली ही किट गरजू गरीब लोकांना मिळत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेवटी मिळाले हे महत्वाचे, अशा प्रतिक्रिया गोरगरीब लोकं देत आहेत.
——————-