Breaking News! पुण्याचा महेंद्र गायकवाड बनला ‘कर्मयोगी केसरी’!
कर्जत (प्रतिनिधी):- मंगळवेढा येथील काकासाहेब पवार कुस्ती संकुलनाचा पैलवान महेंद्र गायकवाड कर्मयोगी केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. त्याला बुलेट गाडी व चांदीची गदा इनाम म्हणून देण्यात आली. आमदार प्राध्यापक राम शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या गटातील कुस्त्यांचे आयोजन कर्मयोगी कुस्ती केंद्राच्या वतीने करण्यात आले होते.
माही जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या कुस्ती स्पर्धा मध्ये झालेल्या अनेक अटीतटी लढतीनी सर्वांची मने जिंकली, या आखाड्यात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत मंगळवेढा येथील पैलवान महेंद्र गायकवाड याने कर्मयोगी केसरी किताब बुलेट व चांदीच्या गदेसह पटकावला, तर दुसऱ्या क्रमांकाच्या टीव्हीएस टू व्हीलर गाडीचा मानकरी कुर्डवाडीचा महारुद्र काळेल तर तिसऱ्या क्रमांकाच्या प्लॅटिना गाडीचा मानकरी माढा तालुक्याचा शिवराम तालमीचा पैलवान दादा शेळके ठरला. चौथ्या क्रमांकाचे इनाम रुपये 25 हजाराचा मानकरी शिवराम तालमीचा पैलवान तानाजी उर्फ मुन्ना झुंजुर्के यांने मिळवले.
70 किलो गटासाठी खेळवण्यात आलेल्या कुस्तीसाठी प्रथम मानकरी अनिल कचरे, द्वितीय जामखेडचा पैलवान संदीप लटके, तृतीय बक्षिसाचा कर्जत चा पैलवान भैय्या शेळके तर चतुर्थ बक्षिसाचा मानकरी माहिजळगावचा पैलवान संग्राम भिसे ठरला. सर्व विजयी पहिलवान यांना आमदार प्रा. राम शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेमध्ये खुल्या गटासाठी एकूण 67 तर 70 वजनी गटांमध्ये 57 व निवडक कुस्त्या झाल्या एकूण 172 पहिलवानांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
या कुस्ती मैदानासाठी पैलवान प्रवीण घुले, नामदेव राऊत, अशोक खेडकर, श्याम भाऊ कानगुडे, बंडा मोढळे, महाराष्ट्र बैलगाडा शर्यती शर्यतीचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके, आबासाहेब गावडे, दादा पाटील, आदींसह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मैदानाचे मुख्य संयोजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉक्टर सुरेश भिसे, सह मैदान यशस्वीतेसाठी रावसाहेब कदम, प्राध्यापक बापू तोरडमल, अतुल केसकर, बापू देवमुंडे, सखाराम केसकर, राम शिंदे, नानासाहेब आरडे, महादेव देवकाते, रवींद्र हाके, महेश शिंदे, उत्तम जानकर, भागवत भिसे, पैलवान दादासाहेब पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.