आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : फुलांची रास, चंदनाचा सुवास, दिव्यांच्या रांगा, अंगणी रांगोळीचे सडे…..नवे पर्व, विचार नवे आली दिवाळी.. आली दिवाळी पसरण्या नव्या आकांक्षांचे घडे……अशा सर्व सुमंगल वातावरणात व सुविचारांत दीपोत्सव सोहळ्याची सुरुवात आळंदीत दिव्यांच्या रोषणाईत दिवाळी ध्यास परिवाराचे वतीने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कुटुंब प्रबोधन प्रमुख डॉ. प्रदीप बिलूरकर, स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनंतराव तेलंग, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी अविनाश ठिपसे, प्रकाश टाकळकर, शिक्षणतज्ञ शाळा व्यवस्थापन समिती बाबाजी काळे, विधितज्ज्ञ निलेश चौधरी, शिक्षणतज्ञ, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थेचे विश्वस्त मुकुंद कुलकर्णी, चंद्रकांत लिंगायत, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आरती विरकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रोहिणी राखुंडे, उपाध्यक्ष, शिक्षक-पालक संघ मंगल मोरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा शब्दबद्ध केली. दिवाळीच्या पाच दिवसांची माहिती सांगत विद्यार्थ्यांनी दिवाळीचे नृत्य सादर केले. पाहुण्यांचा हस्ते मास्टर स्ट्रोक स्पर्धेतील यशस्वीतांना बक्षीस प्रदान करण्यात आले. डॉ. प्रदीप बेलूरकर, कुटुंब प्रबोधन करून दीपावलीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अनंतराव तेलंग यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. प्रकाश टाकळकर यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीरूप मार्गदर्शन करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. बाबाजी काळे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी व भारत तेजाची पूजा करणारा देश अशी माहिती देत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विधितज्ज्ञ निलेश चौधरी यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. विश्वस्त चंद्रकांत लिंगायत विद्यार्थ्यांना फटाके कोणते वाजवावेत याबद्दल मार्गदर्शन केले. विश्वस्त मुकुंद कुलकर्णी सर विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. उपशिक्षिका मनिषा दरेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उपशिक्षिका स्मिता रंधवे यांनी केले . तत्पूर्वी स्वागत गीत गायन झाले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.