मुंबई (प्राची कुलकर्णी) – उद्या (दि.२२) बँकांना सुट्ट्या सुरु होत असल्याने हाती रोख ठेवायची असेल तर आताच काढून घ्या. कारण म्हणजे पुढचे सहा दिवस बँका बंद राहणार आहेत. देशभरात धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सणांमुळे व मध्यंतरी शनिवार व रविवार आणि नियोजित सुट्ट्यांमुळे बहुतेक सार्वजनिक आणि खाजगी वित्तीय संस्था उद्यापासून म्हणजे २२ ऑक्टोबरपासून सलग सहा दिवस बंद राहतील.
दिवाळीनिमित्त २२ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारची बहुतांश कार्यालये बंद राहणार आहेत. बँकांमध्ये चौथा शनिवार असल्याने २२ ऑक्टोबरला सुट्टी असेल. २३ ऑक्टोबरला रविवार आणि २४ ऑक्टोबरला दिवाळीची (लक्ष्मी पूजा) सुट्टी असेल. तर २५ ऑक्टोबरला बँक सुरु होईल, पण त्यानंतर २६ ऑक्टोबरला गोवर्धन पूजा, भाऊभीजनिमित्त बँकेचे कामकाज बंद असेल.
– अशा आहेत सुट्ट्या –
२२ ऑक्टोबर : धनत्रयोदशी या दिवशी आहे. देशभरातील बँका बंद राहणार आहेत. या दिवशी महिन्याचा चौथा शनिवारही आहे.
२३ ऑक्टोबर : रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी.
२४ ऑक्टोबर : देशात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. गंगटोक, हैदराबाद, इंफाळ वगळता संपूर्ण भारतात बँका बंद.
२५ ऑक्टोबर : गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, जयपूर इथे लक्ष्मी पूजा/दिवाळी/गोवर्धन पूजा यासाठी बँक बंद राहणार.
२६ ऑक्टोबर : भाऊबीज, गोवर्धन पूजा/अहमदाबाद, बेलापूर, बेंगळूरु, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, शिमला, श्रीनगर बँका बंद.
२७ ऑक्टोबर : गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊ बँका बंद असणार.