शिंदे – फडणवीस सरकार उठले शेतकऱ्यांचा जीवावर : कृषिमंत्री म्हणतात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही
मुंबई (राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांसह सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे, त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले असताना शिंदे फडवणीस सरकार शेतकऱ्यांचा मुळावर उठले असून राज्यात परतीच्या पावसाने थैमान मांडले आहे . राज्यात झालेल्या अतिवृषटीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून शेतात पाणीच पाणी साचले आहे. मात्र शेतकऱ्यांवर एवढे मोठे आर्थिक संकट आले असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणतात राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थीती नाही. तर ज्या भागामध्ये नुकसान झालं आहे, त्या भागाचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल असेही सत्तार म्हणाले.
परतीचा पाऊस हा काही पहिल्या वर्षी झाला असे नाही. प्रत्येक वेळी तो पडतो, त्याचा अंदाज लावता येत नाही असेही सत्तार म्हणाले. जिथे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतची माहिती आमच्याकडे येत आहे. त्या नुकसानीचा आकडा लकरच कळेल. त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असे सत्तार म्हणाले. प्रत्येक वेळी कृषी विभागाची मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा होते. साडेपाच हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारनं आतापर्यंत दिली आहे. पुढच्या काळातही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सत्तार म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे तो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही नाही याची दक्षता कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी घेतील असे सत्तार म्हणाले. पंचनामा करण्याचे तत्काळ आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पण वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत तोपर्यंत अंतिम नुकसानीचा आकडा येणार नाही असे सत्तार म्हणाले.
पहिल्या नुकसानीचे 3 हजार 500 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 600 कोटी रुपये नंतर दिले त्यानंतर गोगलयीनं नुकसान झालेल्या क्षेत्राला देखील मदत दिली असल्याचे सत्तार म्हणाले. गेल्या 25 वर्षात तत्काळ मदत देण्याच काम पहिल्यांदाच झालं असल्याचे सत्तार म्हणाले. विरोधी पक्षाला फक्त विरोधच करायचा आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आत्महत्येसारखं पाऊस उचलू नका. हा अंतिम पर्याय नसल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.
जून महिन्यापासून आज अखेर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे. या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान खरिपाचे संपूर्ण पीक गेले असून, रब्बी हंगामातील पेरणी केलेले पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील बर्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून, घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.