आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील गोलेगाव पिंपळगाव मध्ये शालेय मुले, कामगार, शेतकरी, जेष्ठ नागरिक,महिला, रुग्ण, प्रवासी यांची पुण्यात ये-जा करण्याची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी अखेर मान्य करीत पीएमपीएमएल ने गोलेगाव पिंपळगाव ते पुणे मनपा या मार्गावर प्रवासी बस सेवा सुरु केली. या सेवेचा प्रारंभ खेड पंचायत समिती सभापती अरुण चौधरी यांचे हस्ते पूजन करून बस सेवा सुरु करण्यात आली.
यावेळी गोलेगाव पिंपळगाव विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन पै.बाळासाहेब चौधरी, माजी चेअरमन कुंडलिक चौधरी, सरपंच अमित चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर चौधरी, वि.वि.का.सोसायटी संचालक ज्ञानेश्वर चौधरी.पोलीस पाटील अनिल शिंदे, वाल्मिक शिंदे, प्रकाश चौधरी, मुरलीधर चौधरी आदी ग्रामस्थ, प्रवासी उपस्थित होते. यावेळी बस मार्ग क्रमांक १३१ चे वाहक चालक यांचा सत्कार चेअरमन पै.बाळासाहेब चौधरी, माजी चेअरमन कुंडलिक चौधरी यांचे हस्ते करण्यात आला. या बसची सेवा गोलेगाव, पिंपळगाव, वडगाव शिंदे, लोहगाव, येरवडा, पुणे स्टेशन मार्गे पुणे मनपा भवन या मार्गावर ही बस सेवा सुरु झाल्याने येथील ग्रामस्थ, शालेय मुले, महिला, रुग्ण, जेष्ठ नागरिक यांनी सेवेचे स्वागत केले.