नांदुरा (तालुका प्रतिनिधी) – अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे संचलित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागातर्पेâ घेण्यात येणार्या ग्रामगीताचार्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार तथा श्री गुरुदेव बहुउद्देशिय ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन भाऊराव बोंदरे यांना या कार्यक्रमात ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधीकारी श्री लक्ष्मणराव्ी गमे तर उद्घाटक म्हणून संचालक मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई बोंडे, प्रमुख अतिथी म्हणून संचालक आजीवन अध्ययन मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ डॉ. श्रीकांत पाटील, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुडे, परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाबराव खवसे, सचिव गोपाल कडू, संघटक अॅड राघोर्ते, ग्रामगीताचार्य सौ. पौर्णिमाताई सवाई,ग्रामगीताचार्य सौ?. विजयाताई दहेकर यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यांचे यशाचे श्रेय त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी, उपसर्वाधीकारी, सरचिटणीस, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, परिक्षा विभागाचे अध्यक्ष, सचिव, परिक्षा नियंत्रक, मार्गदर्शक ग्रामगीताचार्य श्री युवराज अढाऊ,यांचेसह सर्व जेष्ठ कीर्तनकार,प्रचारक, मार्गदर्शक, परिवारातील सदस्य यांना दिले.