Vidharbha

बोरी परिसरात पावसाचा कहर, वीजपडून बैल ठार

उमरखेड, जि. यवतमाळ (तालुका प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, बोरी परिसरात झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाची अतोनात नासाडी झाली आहे. तसेच, शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात बोरी येथील प्रकाश उत्तमराव माने यांच्या बैलावर वीज पडून बैल जागीच ठार झाल्याने, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दि. १४ ऑक्टोबर, शुक्रवारला सायंकाळी चार वाजता बोरी (चा) ता. उमरखेड येथील शेतकरी प्रकाश उत्तमराव माने यांच्या शेतात बैल चरत असताना, अचानक परतीचा पाऊस झाला. त्याचबरोबर विजाचा कडकडाटात बैलावर वीज कोसळली, त्यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. पावसाने कहर केला असून, सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये मेटाकुटीला आलेला शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचे शेतकर्‍याचे संसाधन बैलजोडी त्यामध्येच बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पुढील शेतीचे काम कसे करावे, हा यक्षप्रश्न शेतकर्‍यासमोर उभा राहिला त्या बैलाची अंदाजे किंमत साठ हजार होती. या बाबीकडे शासनाने लक्ष देऊन शेतकर्‍यांना मदत करावी, अशी अपेक्षा शेतकर्‍याकडून होत आहे. उमरखेडचे शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार यांनी लक्ष घालून मदत देण्याची मागणी पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!