विवेकानंद आश्रमाच्या शिरपेचात मानाचा तुरा; विवेकानंद विज्ञान महाविद्यालय ‘नॅक’द्वारा ‘बी++’ श्रेणीने सन्मानित!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विवेकानंद आश्रम हे दर्जेदार शिक्षण, तसेच स्वावलंबी व गुणवत्ताधारक विद्यार्थी निर्माण करणारे मोठे शैक्षणिक केंद्र आहे. निष्काम कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराजांनी आश्रमाचा परिसर शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त व पूरक बनविला आहे. संस्थेद्वारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित विवेकानंद विज्ञान महाविद्यालय चालविले जाते. अल्पावधीतच हे महाविद्यालय स्वतःच्या गुणवत्ता व कौशल्ययुक्त परिपूर्ण शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरले आहे. विवेकानंद विज्ञान महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग निर्देशित बंगळूरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मूल्यांकन परिषद (नॅक) कडून ‘बी++’ प्राप्त झाला आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या तसेच विवेकानंद आश्रमाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
नॅक या स्वायत्त संस्थेतर्फे देशातील महाविद्यालयांचे मूल्यांकन केले जाते. संस्थेतर्फे देशातील महाविद्यालयांची तपासणी केल्यानंतर श्रेणी वाटप केली जाते. त्यासाठी महाविद्यालयांना प्रस्ताव पाठवावे लागतात. त्यानंतर नॅकने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्याची तपासणी करण्यासाठी समिती येत असते. या समितीकडून मूल्यमापन झाल्यानंतर नॅक द्वारा महाविद्यालयांना श्रेणी प्रदान केली जात असते. दि. २९ व ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान नॅक द्वारा त्रिसदस्यीय समिती विज्ञान महाविद्यालयाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आली होती. समितीचे अध्यक्षस्थानी डॉ. मोहम्मद अफशर आलम, कुलगुरू, जामिया हमदर्द, नवी दिल्ली तर सदस्य समन्वयक डॉ. एम. डॅनिएल मुथैय्या, भारतीदशन विद्यापीठ, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू आणि सदस्यपदी डॉ. मोहम्मद फारूक मिर, प्राचार्य, शासकीय पदवी महाविद्यालय, बोम्माई, श्रीनगर हे होते. दोन दिवस चाललेल्या या तपासणीदरम्यान समितीने महाविद्यालयातील सर्व विभागाचे शैक्षणिक उपक्रम, भौतिक सोयी – सुविधा, नवीन उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासकीय बाबी, विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद अशा अनेक गोष्टींची पाहणी केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर डी. पाटील यांनी यावेळी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती समितीस दिली. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, सचिव एस. टी. गोरे, प्राचार्य डॉ. के. डी. पाटील आणि प्रा. मनोज मुर्हेकर यांनी या समितीचे स्वागत केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आई. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. जयप्रकाश सोळंकी यांनी सर्व कामकाज पाहिले. प्रा. सौरभ आंबेकर, प्रा. अमोल शेळके, प्रा. अरुण फाजगे, प्रा. गजानन गायकवाड यांनी नॅक संबंधित विविध जबाबदार्या पार पाडल्या. तसेच प्रा. किशोर गवई, प्रा. समता कस्तुरे, प्रा. मधुरा सातपुते, प्रा. योगेश काळे, प्रा. किशोर गवई, प्रा. कार्तिक भाकडे, प्रा. पूजा वाघ, प्रा. तृप्ती भिसे, डॉ. ज्ञानेश्वर गाडे, विवेक एकघरे, विजय देशमुख, महेश रकटे, रंगनाथ राऊत, गजानन इंगळे, निलेश काळे, संजय काळे यांनी सहकार्य केले. महाविद्यालयास नॅक कडून बी++ मानांकन श्रेणी प्राप्त झाला, त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते आणि विष्णुपंत कुलवंत यांनी प्राचार्य, नॅक समन्वयक, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.