लोणार (विनोद पाटील तेजनकर) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नातून अखेर डोणगाव येथील शेकडो गोरगरीब कुटुंबाना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या उज्वला योजनेतून गॅस शेगडी व गॅस कनेक्शन प्राप्त झाले आहे. काल दसर्याच्या मुहुर्तावर स्वाभिमाने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या कार्यक्रमात या गॅसचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत बर्याच लाभार्थ्यांना अजूनपर्यंत डोणगाव येथे १०० रुपयांमध्ये गॅस वाटप झालेले नव्हते. अनेक गरीब कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित होती. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी ही बाब स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.टाले यांच्या लक्षात आणून दिली व लगेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यासाठी डोणगाव येथील स्वाभिमानी एचपी गॅस पॉइंट यांच्या मदतीने गावातील पात्र लाभार्थींकडून प्रधानमंत्री उज्वला योजनेमार्फत गॅस वाटपासाठी कागदपत्रे गोळा करून ऑनलाइन सादर करण्यात आले. त्यानंतर सतत गेल्या चार महिन्यापासून यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी पाठपुरावा करून शेकडो गॅस मंजूर करून आणले. त्यामुळे डोणगाव येथील महिलांसाठी ‘धूर मुक्त चुल मुक्त’ अभियान राबविले गेले असून यामुळे घरातील धुरामुळे होणारे आजार कमी होतील. तसेच पुढील काळातसुद्धा डोणगांवमधील उर्वरित पात्र कुटुंबांना लाभ देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सातत्याने प्रयत्नशील राहू व शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोचविण्यासाठी स्वाभिमानीचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता मदत करणार आहे. या प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत कोणत्याही कुटुंबाला अजूनपर्यंत लाभ मिळाला नसेल तर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्तेशी संपर्क साधावा, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी व्यक्त केले.
या गॅस वितरण कार्यक्रमप्रसंगी देवेंन्द्र आखाडे, बशिर शहा, सद्दाम शहा, मक्सुद बागवान, दीपक बनसोडे, शैलेश साळे, बिलाल शहा, नितेश पांडव, गणेश काळे, विवेक ठाकरे, बंशी चौधरी यांच्याहस्ते गॅस व इतर साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस मिळालेल्या लाभार्थींच्या चेहर्यावर समाधान दिसून येत होते व त्यांनी या उपक्रमाचे कौतुकसुद्धा केले. या कार्यक्रमासाठी सद्दाम शहा, राजू शेख, सलिम शहा, दिलदार शहा, जावेद शहा, हुसेन शहा, सलिम शहायांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने उज्वला प्रधानमंत्री योजनेचे लाभार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.