उस्मानाबाद (विठ्ठल चिकुंद्रे) – हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीनिम्मित शोभायात्रा समितीच्यावतीने बुधवारी (दि.५) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाविद्यालयापर्यंत भव्य भगवी शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत लक्षवेधक पेहराव करून लहान मुलांपासून युवक, युवती ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सहभागी झाले होते. यावेळी मुख्य रस्त्यावरून विविध ऐतिहासिक कवायती आणि साहसी खेळाचे प्रदर्शन लक्ष वेधून घेत होते. नगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ठेवण्यात आलेल्या आपटा आणि समदाडीच्या वृक्षाची सचिन महाजन आणि माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने आदीच्याहस्ते पूजन करून सोने – चांदी लूटण्यात आले. यावेळी या शोभायात्रेत किरण गायकवाड, विवेक बप्पा हराळकर, राजेंद्र पाटील, मनीष सोनी, माधव पवार, सचिन शिंदे, सचिन जाधव, अमर वरवटे, धर्मराज जाधव, अरूण इगवे, किसन दामावले, दीपक मदनसुरे आदी सहभागी झाले होते. गेल्या ९ वर्षापासून हा कार्यक्रम माऊली प्रतिष्ठानच्यावतीने उमरगा शहरात साजरा करण्यात येतो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात, यात लहान मुलापासून ते जेष्ठ नागरिकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभायात्रा समितीच्या सिध्देश्वर माने, बालाजी मदरे, आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, प्रताप शिंदे, सचिन गाडे, विठ्ठल चिकुंद्रे मेघराज पाटील, विष्णु पांगे, सतीश जाधव, अजित पाटील, अजिंक्य भूमकर, सिद्धू दुधभाते, सुरेश मडोळे, भानुदास बोरुळे, महादेव सलके आदींनी पुढाकार घेतला होता. शहरवासीयांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
————————