आधारभूत किमतीपेक्षा कमीदराने शेतमाल खरेदी, विक्री करणार्या मार्केट कमिट्यांवर कायदेशीर कारवाई करा!
चिखली (विशेष प्रतिनिधी) – आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणार्या मार्केट कमिट्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा पणन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की ज्याप्रमाणे उसाची एफआरपी न देणार्या कारखान्यावर आरआरसीची म्हणजे जप्तीची कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे शेतीमालाच्या केंद्र सरकारने ठरवून दिले एमएसपी (आधारभूत) किंमतीपेक्षा कमी दराने शेतीमाल विक्री करणार्या मार्वेâट कमिट्यांवरदेखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी, न केल्यास आंदोलन करणे बाबत निवेदन दिले आहे. निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, वास्तविक पाहता राज्य शासनाच्या शेतमाल हमीभाव समितीने शिफारस केलेल्या हमीभावापेक्षा केंद्र सरकार किमान ३० ते ३५ टक्के कमी आधारभूत किंमत जाहीर करते व त्यातही मार्वेâट कमिटीमध्ये आधारभूत किमतीच्या पेक्षाही कमी १५ ते २० टक्के दराने शेतीमाल खरेदी किंवा विक्री केला जातो. म्हणजे, शेतकर्यांचा सदर शेतीमालात पन्नास टक्के तोटा होतो. या कारणामुळेच तर भारत आज शेतकरी आत्महत्याचा देश बनला आहे. यावर अनेक समित्यांनी केंद्र सरकारला वेळोवेळी अहवाल दिले आहे. तरीसुद्धा महाराष्ट्रासहित देशभरात शेतीमाल मातीमोल भावाने शासन यंत्रणेमार्फत, मार्केट कमिटी मार्फत खरेदी व विक्री केला जात आहे. यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आज महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. किमान या गोष्टीचा तरी गंभीरपणे विचार होऊन शेतकर्यांची आर्थिक लूट होऊ नये याकडे शासनाने प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्वच मार्वेâट कमिटीमध्ये कोणता ना कोणता शेतीमाल आधारित किमतीपेक्षा कमी दराने खरेदी किंवा विक्री केला जातो. यावरती त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. तरी तात्काळ शेतकरीविरोधी धोरण राबवणार्या मार्वेâट कमिट्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रयत क्रांती पक्षाच्यावतीने करण्यात आल्याचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले आहे.