चिखली (तालुका प्रतिनिधी) – जनतेमध्ये आपल्या नावाची प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने अनेकजण आपआपला वाढदिवस डीजे लावून अथवा बॅनर लावून साजरा करतात. मात्र इकडे येवता येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बी. बी. शिंगणे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यावर खर्च केला. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी संगीतप्रेमी शिक्षक आर.पी.गाडेकर यांनी विद्यार्थिनींच्या सुमधुर आवाजात बसविलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. चिखली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आर. डी. शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी आर.आर.पाटील, केंद्र प्रमूख देवकर, सपकाळ सर, शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी प्रदीप अपार, गजानन गायकवाड, विनोद कड, प्रविण बाहेकर, डायटचे प्रविण वायाळ, प्रभाकर पाटोळे, एम.डी.परिहार, प्रकाश वाघ, सुनिल भवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सरपंच निवृत्ती मैंद, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर, तसेच शिक्षक आर.पी.गाडेकर, आर.एम.गायकवाड, डी.डी.गायकवाड, आराख सर, बलकार सर, गरूड सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण गरूड यांनी तर प्रास्ताविक बी.बी.शिंगणे सर यांनी केले.