मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता शिंदे गटाच्या युवा सेनेची कार्यकारिणी जाहीर करत, आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला लक्ष्य केले आहे. या युवा सेनेत बहुतांश शिंदे गटासोबत असलेल्या नेते, आमदार, खासदार यांच्याच चिरंजीवांना स्थान मिळाल्याचे दिसते आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. शिवाय, या निमित्ताने बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांनाही या कार्यकारिणीत विदर्भातून स्थान मिळाले असून, यानिमित्ताने त्यांची आता राज्याच्या राजकारणात एण्ट्री झाली आहे. ऋषी यांनी यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्यासोबतही काम केलेले आहे. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरेंसोबत काम करणाऱ्यांनाच शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली असल्याचे दिसते आहे.
– युवा सेना कार्यकारणी सदस्य –
उत्तर महाराष्ट्र : अविष्कार भुसे
मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर
कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई व पालघर : नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील
——————