नंदूरबार (आफताब खान) – राज्यातील मिरचीचे आगार म्हणून नंदूरबार जिल्ह्याची ओळख आहे. लाल मिरचीचा हंगाम सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे. मात्र जिल्ह्यात हिरव्या मिरचीचा हंगाम जोरात सुरू झाला आहे.
गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात हिरव्या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने नंदूरबार परिसरात हिरव्या मिरचीच्या तोडणीला सुरुवात झाली असून, बाजारातही मिरचीची आवक वाढली आहे. तर ग्रामीण भागात बाहेरील राज्यातील व्यापारी दाखल होत असून, शेतकर्याच्या बांधावर हिरव्या मिरचीची खरेदी केली जाते आहे. हिरव्या मिरचीला सध्या २० ते २५ रुपये दरम्यान दर मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये समाधान आहे. व दुसरीकडे अजून दर वाढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.
—————