Breaking newsCrimeHead linesPachhim MaharashtraPune

वानवडी येथील बनावट पनीर बनविणार्‍या कारखान्याचा पर्दाफास!

– मोठ्या प्रमाणात हॉटेल्सला होत होता पुरवठा, अनेकांचे आरोग्य धोक्यात!

पुणे (युनूस खतीब) – वानवडी येथील बनावट पनीर तयार करणार्‍या कारखान्याचा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने टाकलेल्या छाप्यात पर्दाफास झाला असून, मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस असे या कारखान्याचे नाव आहे. या कारखान्याला कसलाही परवाना नसताना येथे बोगस पनीर बनवले जात होते. विशेष म्हणजे, हे बनावट पनीर हॉटेल्सला विकले जात होते. या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून आल्याने कारवाई करुन मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे.

कारखान्यावर छापा टाकला असता ८०० किलो बनावट पनीर तयार करून ठेवल्याचे आढळले. हे पनीर तयार करण्यासाठी ३५० किलो स्किम्ड मिल्क पावडर व २७० किलो पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातून तपासणीसाठी नमूने घेत किंमत १ लाख ६७ हजार ७९० रूपये किमतीचे ७९९ किलो पनीर, १ लाख २१ हजार ८०० रूपये किमतीचे ३४८ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ३९ हजार ६६४ रूपये किमतीचे २६८ किलो आर बी डी पामोलीन तेल असा एकूण ३ लाख २९ हजार २५४ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदर नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून, अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सहाय्यक आयुक्त बाळू ठाकूर, अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल प्रâी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!