पी. एम. स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांना कर्ज वाटप करा
खामगाव(ब्रेकिंग महाराष्ट्र)- : पी.एम. स्वनिधी योजनेअंतर्गत शहरातील लाभार्थ्यांना २० हजार रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याचे वाटप करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या नेतृत्वात स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा खामगांवचे शाखा प्रबंधक यांना १२ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.
खामगांव शहरातील अनेक छोटे उद्योग करणाऱ्या व्यवसायीकांनी पी.एम.स्वनिधी योजनेसाठी आपल्या बँकेत सविस्तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेले आहेत. आपल्या बँकेने अद्यापपावेतो लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिलेला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी लाभार्थ्यांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे वाटप केलेले आहे. कोरोना काळात छोट्या उद्योगाकरीता देशाचे पंतप्रधान यांनी ही योजना सुरू केलेली आहे. एकाप्रकारे आपण छोट्या उद्योग करणाऱ्या व्यवसायीकांना कर्जाचे वाटप न केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. तरी याबाबत लवकरात लवकर लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या बँकेसमोर तिव्र आंदोलन करण्यात येईल व यापासून उद्भवणाऱ्या संपुर्ण परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील असा इशारा वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, शहराध्यक्ष धम्मा नितनवरे, दिपक महाजन, शेख रहीम शेख हसन, अल्लाबक्ष खान अबरार खान, शेख वसीम शेख कलीम, अब्दुल मोमीन अब्दुल गफ्फार यांच्यासह इतर उपस्थीत होते.