– अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, मुलीचा शोध सुरु!
मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रतिनिधी) – येथील शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारी वर्ग १० वीतील अल्पवयीन विद्यार्थिनी गावातील मुलीसोबत मानव विकास मिशनच्या एसटी बसमध्ये शाळेत बसून आली होती. मात्र बसमधून शाळेच्या गेटवर जाताच एका तरुणाने तिला फूस लावून पळून नेले. अशी तक्रार विद्यार्थिनीच्या वडिलाने अंढेरा पोलीस स्टेशनला ८ सप्टेंबररोजी दिली. या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मेरा बु. येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये ५ वी ते १२ वीपर्यतचे शिक्षण घेण्यासाठी खेड्यावरचे शेकडो मुले मुली येतात. त्यामध्यें एका गावातील रहिवासी असलेली १५ वर्ष वयाची विद्यार्थिनी वर्ग १० वी मध्ये शिक्षण घेत होती. ती दररोजच्या प्रमाणे सकाळी मानव विकास मिशन एसटी बसमध्ये बसून गावातील मुलीसोबत शाळेत गेली. एसटी बसमधून खाली उतरली आणि शाळेच्या गेटपर्यंत गेली. मात्र मुलींसोबत वर्गात न जाता दुकानातून लेटर आणते असे मैत्रिणीला सांगून बाहेर निघून गेली. बराच वेळ होवूनही ती परत शाळेत आली नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी हा प्रकार वर्गशिक्षकेला सांगितला असता, त्यांनी लगेच मुलीच्या वडिलांना घडलेली हकिकत फोनवर सांगितली. वडिलांनी शाळेत जावून विचारपूस केली, तसेच आजूबाजूलाही विचारपूस केली. परंतु, सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी एसटी बसमध्ये बसून घरी येईल असे वाटत होते. मात्र सायंकाळीसुध्दा बसमधून गावात आली नाही.
तेव्हा गावात माहीत झाले असता, एक मुलगा सुध्दा गावातून फरार असल्याचे कळाले. तेव्हा, असे समजले की या अगोदरही या मुलाने मुलीला फोन करून छडले होते. त्यावेळेस त्याला समजावून सांगितले होते. मात्र त्यानेच आम्हाला धमकी दिली होती. सायंकाळच्या दरम्यान गावात फोन आला की त्याची मोटासायकल राहेरी येथे जुन्या दूध डेअरीजवळ बेवारस अवस्थेत उभी आहे. तेथील पोलिस पाटील यांनी गाडीवरचा नंबर एम एच २८ बीआर ०८२२ हा सर्च करुन गाडी मालकाला फोन लावून सांगितले. अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीवरून ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार शिरसाट यांनी आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या भामट्या मुलाने मुलीवर काही लैंगिक अत्याचार वैगरे केला तर वाढीव कलमे लावून मुलाला कठाेर जेल हाेणे निश्चित आहे.