अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे- सागर फुंडकर
खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र):-१० सप्टेंबर रोजी सायंकाळी खामगाव शहर व तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामुळे खामगाव तालुक्यातील चिखली, आमसरी, सुजातपुर, पिंप्री देशमुख व लांजुड परिसरात मका कपाशी पिकाचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया सेलचे सह संयोजक सागर फुंडकर यांनी चिखली आमसरी परिसराला भेट दिली.
१०सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मका व कापशी सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरची माहिती कळताच भाजपा सोशल मीडिया सेलचे सहसंयोजक सागर दादा फुंडकर यांनी आमसरी चिखली परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी या परिसरातील अनेक शेतामधील मका व कपाशीचे पीक वादळी वाऱ्यामुळे आडवे झाले होते, त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी त्यांनी संबंधितांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी त्यांच्यासोबत अंबादास पाटील,राम मिश्रा, रवी धुरंदर सरपंच पती आमसरी, गणेश डहाके,गोपाल तायडे, अशोक धुरंदर,दिगंबर बेलोकार,संजय धुरंदर,विनोद कुटे,प्रवीण तायडे, आदींची उपस्थिती होती.