सिंदखेड राजा (ब्रेकिंग महाराष्ट्र):- मलकापूर पांग्रा येथील काळी ठिकुरी परिसरात शुक्रवारी दुपारी पहिल्यांदाच बिबट्या दिसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या दिसल्याची वार्ता गावात पसरताच बिबट्याला बघण्यासाठी लोकांनी धाव घेतली. यावेळी अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुनील सावंत यांनी तात्काळ वन विभागाला याबात सूचना दिल्या त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा शोध घेतला असून या बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे
ज्या परिसरात बिबट्या दिसला त्या परिसराला लागूनच वन विभागाची जंगल आहे. या जंगलात रोही, हरीण, रानडुक्कर मोठया प्रमाणात असतात मात्र या परिसरात पहिल्यांदाच बिबट्या दिसला आहे. दुपारी शेख रफिक शेख नवाज आणि अब्रार शेख हे शेतात गेले असताना तिथे कुत्रे भुंकण्याचा आवाज आला त्यामुळे रोया असेल. या भावनेने त्यांनी सुरुवातीला नजर अंदाज केले मात्र कुत्रे जास्त भुंकू लागल्याने ते त्या दिशेने गेले असता अचानक बिबट्या तिथून पळायला लागला. त्यामुळे घाबरून त्यांनी गावात ही माहिती दिली व तेथे बिबट्याला पाण्यासाठी मोठया प्रमाणात लोक जमा झाले. त्यानंतर तहसीलदार सुनील सावंत यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी वन विभागाला तात्काळ सूचना केल्या व विभागाचे राजेंद्र शेळके यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा शोध घेतला. एका जाळीत बिबट्या असल्याचे दिसले नंतर तो बिबट्या हनवत खेडकडे गेला बिबट दिसल्याने या परिसरात सध्या बिबट्या चर्चा आणि दहशत सर्वत्र गावात सुरू आहे. त्यामुळे वन खात्याने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.