आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : गेल्या दोन वर्षात असलेले कोरोना महामारीचे सावट यावर्षीचे गणेशोत्सवावर नसलेने तसेच यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त उत्साही वातावरणात साजरा करण्याचे राज्य शासनाचे धोरण यामुळे यावर्षी आळंदी पंचक्रोशीत मोठ्या उत्साही वातावरणात गणेशोत्सव आनंद सोहळा साजरा होत आहे. आळंदी मंदिरासह परिसरात सर्वत्र उत्साही आनंदी, गणेश भक्तिमय जल्लोष, हरिन्ग गजरात गणेशोत्सवास प्रथापरंपरांचे पालन करीत बुधवारी ( दि.३१ ) सुरुवात झाली. एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सव या उपक्रमास मात्र यावर्षी फाटा देत ठीकठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाली. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळा निर्बंधमुक्त होत असला तरी परिसरातील सर्व नागरिक,सार्वजनिक मंडळे यांना भाविक,नागरिक यांची उत्सवात शांतता सुरक्षितता कायम राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने केल्या आहेत.
आळंदीत माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री हजेरी मारुती मंदीर येथे तसेच शिवतेज तरुण मित्र मंडळ,व्यापारी तरुण मंडळ,अखिल भाजी मंडई मंडळ,जय गणेश मंडळ,शिवस्मृती मित्र मंडळ,दत्तनगर प्रतिष्ठान, जय गणेश प्रतिष्ठान आदी मंडळांसह पंचक्रोशीतील औद्योगिक वसाहतीतील राठी पॉली बॉण्ड इंडिया प्रा.ली या कंपनीत देखील उत्साहात गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भालचंद्र कुलकर्णी यांचे हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शिवाजी पडवळ, महेंद्र फणसे, प्रीती वर्मा, श्रीकुमार दंडापाणी, शरद राऊत, प्रशांत शिंदे, राम बिराजदार, गणेश तावरे, माऊली शेखर, निवास महाजन , गोरक्ष बटवाल,पंडित पठारे, अनिल राठोले,राजेंद्र बुरडे,संजय थोरवे, संदीप अटळकर, माणिक पडवळ, सोमनाथ कदम, राजू इच्छे, विश्वास सुपेकर, सदानंद बवले, प्रकाश बुधवंत आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ध्यास प्रशालेत गणेशाचे उत्साहात आगमन
येथील ध्यास फाउंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिर विभागांत गणेशाचे शुभ आगमन जल्लोषात करण्यात आले. ‘ आला आला माझा गणराया ‘ अशी साद घालत गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विधितज्ज्ञ श्री.व सौ.राजेश ठाकूर सहकुटुंब, सहपरिवार या दाम्पत्यांच्या हस्ते गणेशपूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी, गोपाल उंबरकर यांच्या हस्ते उभयतांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन सन्मान करण्यात आला. या शुभ सोहळ्यासाठी इयत्ता पाचवी मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत गणेशाची प्राणप्रतिष्ठा, आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते धार्मिक कार्यक्रम आणि श्रींची आरती करण्यात आली. आळंदी पंचक्रोशीत मंगलमय वातावरणात श्रींचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात झाली. यावेळी विधिवत पूजा करून उत्सवाचे कार्यक्रमास सुरुवात झाली. घरा घरात श्रीची मंगल मूर्ती मोरयाचे नामजयघोषात बसविण्यात आली. यावर्षीही श्री गणेश स्थापना दिनी मिरवणुकी वर बंदी तसेच डी.जे वाजविण्यास बंदी असल्याने परंपरागत वाद्य वाजविता साधे पद्धतीने श्रींचे आगमन झाले. भक्तिमय वातावरण व गणेश भक्तांमध्ये जल्लोष दिवसभर होता.