Chikhali

ई-केवायसी न केल्यास पीएम-किसान याेजनेचे पैसे मिळणे हाेणार बंद!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप माेरे) – पंतप्रधान किसान याेजनेचे पैसे मिळणे चालू ठेवायचे असेल तर, लाभार्थी शेतकरी यांनी ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे, असे आवाहन चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी केले आहे.  शासनाच्या असे निर्देशनास आले की शेकडो शेतकऱ्यांनी e-KYC केवायसी प्रमाणिकरण पूर्ण केलेले नाही,  अशा शेतकऱ्यांना पी.एम.किसान योजनेचा ऑगस्ट २०२२ नंतरचा दाेन हजार रुपयांचा लाभ तसेच पुढील उर्वरीत हप्त्यांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे तालुक्यातील एकही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शेकऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी,  अशा सूचना तहसील कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये तहसीलदार येळे यांनी अधिकारी व कर्मचा-यांनां दिल्या आहेत.

चिखली तहसील कार्यालयात २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार अजितकुमार येळे यांच्या उपस्थितीत तालुक्यतील सर्व मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार  यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती . मीटिंग मध्ये तहसिलदार यांनी सांगितले की, केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना पी एम किसान योजने अंतर्गत दर तीन महिन्याला दोन हजार रुपयाचा लाभ दिल्या जात आहे, यासाठी केवायसी नोंदणी करणे गरजेचे होती. मात्र शासनाच्या निर्देशनास आले की शेकडो शेतकऱ्यांनी आज पर्यत केवायसी प्रमाणिकरण (नोदणी) पूर्ण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांना पी.एम.किसान योजनेचा पुढील ऑगस्ट २०२२ नंतरचा रू. २०००/- चा लाभ तसेच पुढील उर्वरीत हप्त्यांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तालुक्यातील एकही शेतकरी या योजनेच्या लाभा पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व मंडळ अधिकारी , नायब तहीलदार यांनी आपआपल्या परिसरातील गावांमध्ये जावून शेतकऱ्यांना केवायसी नोदणी करण्याचे आवाहन करावे. तसेच Pm Kisan E kyc प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रामध्ये जावून नोदणी करण्याचे सांगावे, जेणे करून एकही शेतकरी वंचित राहणार याची दखल घ्यावी, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!