Breaking newsBuldanaMaharashtraVidharbha

बुलढाणा जिल्ह्यात ‘भाईगिरी’साठी शस्त्र बाळगण्याची क्रेझ : आर्म ॲक्टचे 19 गुन्हे दाखल,43 आरोपी गजाआड

बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- दिवसागणिक संवेदनशीलता कमी होत असून, गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारी जगतात वर्चस्वासाठी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगण्याची क्रेझ दिसून येत आहे. 21 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 धारदार शस्त्र जप्त करून,3 आरोपींना गजाआड केले. गेल्या 6 महिन्यात जवळपास अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी आर्म ॲक्टचे 19 गुन्हे दाखल झालेत. यामध्ये 43 आरोपींकडून विविध प्रकारची घातक शस्त्रे जप्त केल्याने ‘भाईगिरी’ बळवल्याचा प्रत्यय येत आहे.

 

संवेदनशीलता घटत चालली तर गुन्हेगारीकडे पावले वळत आहेत. प्रत्येक क्षेत्रात वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते. तशीच लढाई गुन्हेगारी जगतातही पहावयास मिळत आहे. गुन्हेगारीमध्ये दरारा टिकवून ठेवण्यासाठी व अन्य कारणांनी देशी कट्ट्यासह धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बुलडाणा जिल्ह्यासह मध्यप्रदेशातून शस्त्र आणली जात आहेत. गेल्या 6 महिन्यात 19 आर्म ॲक्ट गुन्हे दाखल करून 43 आरोपींच्या मुस्क्या स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथकानी आवळल्या आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवायामुळे शस्त्र बाळगणाऱ्यांंमध्ये धडकी जरी भरली असली तरी ही शस्त्रे येतात तरी कोठून, हा प्रश्न उपस्थित होत आहे.विशेष म्हणजे अशिक्षीत आणि झोपडपट्टी परिसरातील युवकांकडेच ही शस्त्रे आढळत आहेत.धक्क्याला बुक्की लागल्यानंतर तत्काळ पिस्टल काढून धमकी देणारे युवक गुन्हेगारीत दबदबा कायम रहावा म्हणून शस्त्र बाळगतात, हे सर्वश्रुत आहे.गुन्हेगारीच्या वर्चस्वासाठी शस्त्र बाळगण्याचा ट्रेंड कधी नाहीसा होईल हे माहित नाही.मात्र, ही शस्त्रे बाळगण्याची क्रेझ 25 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. एकूणच नवतरूणांची वाटचाल गुन्हेगारीकडे होत असून, ही बाब पोलिसांसह समाजाला अस्वस्थ करणारी आहे. पोलिसांनी अटक केलेल्या बहुतांश आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

शस्त्र येतात तरी कुठून? 

पिस्टल आणि धारदार शस्त्रे ही मध्यप्रदेश,अजमेर, इंदूर, येथून तर बुलडाणा जिल्ह्यातील टुनकी, बावनबीर येथून शस्त्र आणला जातात व अन्य ठिकाणी पाठविल्या जात असल्याचे बोलल्या जाते.विशेष म्हणजे, 25 हजारापासून एक लाखापर्यंत शस्त्र बनवून दिली जातात. केवळ खंडणी मागणीसाठी आणि गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व कायम राहावे म्हणून शस्त्र खरेदी केली जात असल्याची माहिती आहे.

 

 

 

जिल्ह्यातील व परराज्यातील गुन्हेगार पोलिसांच्या रडावर आहेत. गुन्हेगारांचे समोर उच्चाटन करण्याची मोहीम सुरू असून, गेल्या सहा महिन्यात 40 आरोपींकडून विविध प्रकारची घातक शस्त्र जप्त करण्यात आली. 21 ऑगस्टला 3 आरोपींकडून 6 तलवारी जप्त करण्यात आल्या. कारवाईसाठी जिपोअ अरविंद चावरिया यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

       – बळीराम गीते

स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख, बुलडाणा.

 

 

 

 

अजिंठाकडे जाणाऱ्या तलवारी जप्त

बुलडाणा शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, एम एच 28 टी 1460 क्रमांकाच्या ऑटोमध्ये 32.5 इंच लांबीच्या 5 धारदार तलवारी आढळून आल्या. शेख परवेज शेख शकील, सय्यद समीर सय्यद इसूब, सय्यद साकीब सय्यद अलीम सर्व रा.जोहर नगर, बुलडाणा या 3 आरोपींचा ऑटो बुलडाण्यावरून अजिंठाकडे जात होता. आरोपींना अटक करून त्यांच्याकडील तब्बल 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!