– सार्वजनिक बांधकाम विभाग कुणाचा जीव जाण्याची वाट पाहात आहे का?
गंगापूर (औरंगाबाद)/ गुलाब वाघ
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ते देवगाव रोएफल्डवर असणार्या माळीवाडगाव जवळील भीमनगर येथील वळई नदीवर असणार्या पुलाला सरक्षक कठडे नसल्याने प्रवश्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आत्तापर्यंत त्याठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारात अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार पुलाच्या खाली वळई नदीत पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम कुणाचा जीव जाण्याची वाट पाहात आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नुकताच कायगाव ते देवगाव हा रस्ता ५८ कोटी रुपये खर्चून डांबरी झाला असून, त्यामुळे सर्वच वाहने वेगाने धावतात. मात्र वळई नदीच्या असणार्या पुलाला कठडे अथवा संरक्षक पाईप नसल्याने हा पूल जीवघेणा बनला असून, प्रवश्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने या पुलाला लवकरात लवकर सरक्षक काठडे अथवा पाईप बसवण्याची मागणी होत आहे.
माळीवाडगाव जवळील भीमनगर येथील वळई नदीवर असणार्या पुलाला संरक्षक कठडे अथवा पाईप नसल्याने ओव्हरटेक करण्याच्या वेळी पुलाचा अंदाज दुचाकी वाहनधारकाना येत नाही. त्यामुळे अनेकवेळा अंधारात अंदाज न आल्याने दुचाकीस्वार पुलाच्या खाली दुचाकीसह पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर काही दुर्घटना घडण्याच्या आत या पुलाला संरक्षक कठडे अथवा पाईप बसवण्यात यावेत.
– शेषराव जाधव (संचालक,बाजार समिती लासूर स्टेशन)माळीवाडगाव नजीक असलेल्या भीमनगर येथील वळई नदीवरील नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून त्या पुलाच्या कामाला सुरुवात व्हायला अजून चार ते पाच महिने लागतील. मात्र तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात येईल.
– तांगडे (अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग )